फुलांमध्ये दडला होता 5 फूट लांब कोब्रा; बेडकाचा आवाज आला आणि...

Last Updated:

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अनेकजणांना सर्पदंश झाला, मात्र सुदैवाने यात कोणाचा मृत्यू झाला नाही. सर्वांनी वेळच्या वेळी उपचार करून घेतले.

हा साप तब्बल 10 वर्षांचा होता. त्याच्यात मोठ्याप्रमाणात विष होतं.
हा साप तब्बल 10 वर्षांचा होता. त्याच्यात मोठ्याप्रमाणात विष होतं.
अंकित कुमार सिंह, प्रतिनिधी
सिवान, 5 ऑगस्ट : पावसाळा सुरू झाल्यापासून साधारण दररोज साप आढळल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. बिहारमध्येदेखील सापांनी धुमाकूळ घातला आहे. सिवान जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अनेकजणांना सर्पदंश झाला, मात्र सुदैवाने यात कोणाचा मृत्यू झाला नाही. सर्वांनी वेळच्या वेळी उपचार करून घेतले.
खरंतर साप किंवा विंचूसारखे विषारी प्राणी अडगळीच्या किंवा अंधाऱ्या, ओलसर भागात आढळतात. परंतु सिवानच्या बडरम भागात मात्र फुलांमध्ये भलामोठा कोब्रा दडून बसला होता. त्याला पाहून गावकरी प्रचंड घाबरले. आरडाओरडा आणि किंचाळ्यांनी संपूर्ण गावात एकच गोंधळ झाला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बडरमचे रहिवासी इश्माएल अहमद यांच्या घरात हा साप होता. घरातून निघून तो शेजारच्याच एका भिंतीकडेला फुलांमागे अलगद लपून बसला होता. घराबाहेरून बेडूक ओरडण्याचा विचित्र आवाज आल्याने घरातील व्यक्तींनी बाहेर डोकावून पाहिलं असता 5 फुटांचा साप तोंडात बेडूक पकडून वळवळताना दिसला. घरातील व्यक्तींनी याबाबत गावकऱ्यांना सांगण्याआधी तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला. माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन मोठ्या मेहनतीने सापाला पकडलं. मात्र तोपर्यंत गावात साप घुसल्याची बातमी गावभर पसरली होती आणि फणा काढलेल्या सापाला पाहून गावकऱ्यांची धाकधूकही वाढली होती.
advertisement
सर्पमित्र शत्रुघ्न कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा साप तब्बल 10 वर्षांचा होता. त्याच्यात मोठ्याप्रमाणात विष होतं. या प्रजातीचा साप फार क्वचितच जमिनीवर दिसतो, अन्यथा तो बिळातच राहतो. तसंच हा साप चावल्यानंतर व्यक्तीचं जगणं फार अवघड असतं', असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या/देश/
फुलांमध्ये दडला होता 5 फूट लांब कोब्रा; बेडकाचा आवाज आला आणि...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement