चालत्या बसमध्ये आला 'सायलेंट किलर', केबिनमध्ये कोसळून ड्रायव्हरचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
चालत्या बसमध्ये ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बसमधल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
केळवा : चालत्या बसमध्ये ड्रायव्हरचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बसमधल्या सीसीटीव्हीमध्ये ड्रायव्हरच्या हार्ट अटॅक आणि मृत्यूचे क्षण रेकॉर्ड झाले आहेत. 36 वर्षांच्या या ड्रायव्हरचं नाव सतीश राव असं आहे. बुधवार 27 ऑगस्ट रोजी ही दुर्दैवी घटना घडली आहे. गाडी चालवत असतानाच सतीश राव यांना अस्वस्थ वाटायला लागलं, त्यामुळे त्यांनी बस थांबवून त्यांच्या सहकाऱ्याला गाडी चालवायला दिली आणि ते स्वत: बाजूला जाऊन बसले.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार केळवा-राजनगरजवळ घटनेच्या सुमारे 15 किमी आधी सतीश राव यांना अस्वस्थ वाटायला लागले, त्यामुळे त्यांनी स्लीपर बसचा ताबा सहकाऱ्याला दिला आणि सतीश राव ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी जाऊन बसले, दरम्यान सतीश राव बस चालू असतानाच वैद्यकीय मदत शोधत होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सतीश ड्रायव्हरच्या शेजारी पाय पसरून बसल्याचं दिसत आहे. तर जवळच बसलेली महिला समोरचा प्रकार बघून थबकलेली दिसत होती. यानंतर इतर प्रवासी मदतीसाठी धावले आणि त्यांनी सतीश राव यांना ताबडतोब देसुरी रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी सतीश राव यांना मृत घोषित केलं.
advertisement
#Pali: निजी बस चालक की मौत का मामला, बस चालक का मौत की घटना कैमरे में हुई कैद | CCTV Footage #FINVideo #RajasthanWithFirstIndia #CCTVFootage #PaliPolice @PaliPolice pic.twitter.com/HqjOlFceJe
— First India News (@1stIndiaNews) August 29, 2025
advertisement
सायलेंट हार्ट अटॅकमुळे सतीश राव यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. प्रवासादरम्यान सतीश राव यांचे सहकारी आणि काही सहप्रवाशांनी त्यांची छाती दाबून आणि पायावर मालिश करून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला, पण या उपचारांना ते प्रतिसाद देत नव्हते.
सतीश राव हे जोधपूरच्या भोजासर येथील रहिवासी होते. सतीश राव यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूची चौकशी किंवा शवविच्छेदन करायला नकार दिला आहे. सतीश राव यांनी धोका ओळखून वेळेमध्ये सहकाऱ्याला बस चालवायला दिली, त्यामुळे त्यांच्या प्रसंगावधानाचंही कौतुक केलं जात आहे. सतीश राव यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अपघात टळला. सतीश राव घेऊन जात असलेली ही बस इंदूरहून जोधपूरला जात होती.
view commentsLocation :
Pali,Rajasthan
First Published :
August 29, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/देश/
चालत्या बसमध्ये आला 'सायलेंट किलर', केबिनमध्ये कोसळून ड्रायव्हरचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा Video


