CM Rekha Gupta Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर हल्ला, हल्लेखोर पोलिसांना चकवा देऊन CM हाऊसमध्ये कसा शिरला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
CM Rekha Gupta Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
Delhi CM Rekha Gupta Attacked : दिल्लीला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सीएम हाऊसमध्येच हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. रेखा गुप्ता कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत असताना हा हल्ला झाला. यामध्ये मुख्यमंत्री काहीप्रमाणात जखमी देखील झाल्याची माहिती आहे. पण हल्लेखोर सीएम हाऊसमध्ये कसा पोहोचला?
नेमकं काय झालं? पाहा
अचानक हात पकडून खेचण्याचा प्रयत्न
जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मुख्यमंत्री यांचे काही कागदपत्रे दिल्यानंतर अचानक हात पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. या वेळी थोडी धक्काबुक्की झाली. त्यानंतर लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. तो कोण होता आणि इतर सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. मुख्यमंत्री यांची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. त्या एक खंबीर महिला असून त्यांच्या डोक्याला थोडी दुखापत झाली आहे. राजकारणात अशा घटना घडणं निंदनीय असल्याचंही दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे.
advertisement
#WATCH | Attack on Delhi CM Rekha Gupta during Jan Sunvai | As he arrives at the CM residence, BJP MP Praveen Khandelwal says, "...She goes among the public while speaking with them. So, he (accused) took advantage of that...CM is stable. She will work as usual. There is no need… pic.twitter.com/vKXQqu3W8k
— ANI (@ANI) August 20, 2025
advertisement
दिल्ली पोलिसांनी काय म्हटलंय?
दरम्यान, दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपीने त्याचं नाव राजेश खिमजी असं सांगितलं आहे आणि तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. त्याचं नाव आणि पत्ता पडताळला जात आहे. त्याची कागदपत्रे देखील तपासली जात आहेत.
Location :
Delhi
First Published :
August 20, 2025 11:08 AM IST
मराठी बातम्या/देश/
CM Rekha Gupta Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर हल्ला, हल्लेखोर पोलिसांना चकवा देऊन CM हाऊसमध्ये कसा शिरला?