Sonia Gandhi : सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधींना दाखल करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 78 वर्षांच्या सोनिया गांधी यांना गुरूवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांची एक टीम सोनिया गांधींवर उपचार करत आहे.
सोनिया गांधी या उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
February 20, 2025 11:23 PM IST


