Cheque बघून कॅशिअरला आली चक्कर, Drawing शिक्षकाला घरी पाठवले; शिक्षण विभागाची मोठी कारवाई, पुढचा नंबर मुख्याध्यापकांचा

Last Updated:

School Principal Cheque: हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील रोनहाट शाळेतील ड्रॉईंग शिक्षक अत्तर सिंह यांना चेकवरील इंग्रजी स्पेलिंगच्या भयंकर चुका केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. या चुकांमुळे शिक्षण विभागाची देशभरात मोठी फजिती झाली असून, मुख्याध्यापकांवरही कारवाईची शक्यता आहे.

News18
News18
सिरमौर: गेल्या चार ते पाच दिवसांपासून एका चेकची चर्चा संपूर्ण देशभरत होत आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली आहे. शिक्षण विभागाच्या चेकवर झालेल्या इंग्रजी स्पेलिंगच्या विचित्र चुका चर्चेचा झाला होता. या प्रकरणी आता सिरमौर जिल्ह्यातील रोनहाट शाळेतील ड्रॉईंग शिक्षक (DM) अत्तर सिंह यांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी सिरमौरचे उपसंचालक (Deputy Director) यांनी ही कारवाई केली. शाळेचे मुख्याध्यापक यांच्याविरोधातही कारवाईचा विचार सुरू आहे.
advertisement
हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाला देशभरात मोठ्या प्रमाणात कटकटीला सामोरे जावे लागले होते. चेकची घटना २५ सप्टेंबरची आहे. हा चेक मिड-डे मील इंचार्ज आणि ड्रॉईंग मास्टर अत्तर सिंह यांच्या नावाने 7,616 रुपयांसाठी जारी करण्यात आला होता. मात्र हा चेक रकमेच्या देयकासाठी नव्हे, तर त्यावरील इंग्रजी स्पेलिंगमधील धक्कादायक चुका यामुळे चर्चेत आला.
advertisement
काय आहे प्रकरण?
अत्तर सिंह यांच्या नावावर 7,616 रुपयांचा चेक काढण्यात आला होता. आकड्यांमध्ये रक्कम योग्यरीत्या लिहिलेली असली तरी इंग्रजी शब्दांमध्ये लिहिताना एक नव्हे, तर अनेक चुका करण्यात आल्या होत्या.
advertisement
7,616 ही रक्कम इंग्रजीतSeven Thousand Six Hundred and Sixteen” अशी लिहिली जायला हवी होती. पण चेकवरSaven Thursday Six Harendra Sixty” असे लिहिलेले होते!
advertisement
Seven’ पासूनHundred’ पर्यंत प्रत्येक शब्दाचा स्पेलिंग चुकीचा होता, तसेचSixteen’ च्या जागीSixty’ लिहिले होते. म्हणजेच हा चेक मराठीत वाचायचा तरसवेन थर्सडे सिक्स हरेन्द्र सिक्सटीअसा उच्चार होईल ज्यावरून सगळ्यांनी खिल्ली उडवली.
advertisement
या चेकवर शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्वाक्षरी आणि शिक्का देखील होता. त्यामुळे प्रश्न अधिक गंभीर झाले. ही घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाची मोठी फजिती झाली आणि सोशल मीडियावर या चेकचा फोटो व्हायरल झाला.
advertisement
article_image_1
शिक्षा विभागाची तत्काळ कारवाई
या प्रकरणानंतर शिक्षण विभागाने तत्काळ चौकशी केली. चौकशीत प्राथमिक जबाबदारी ड्रॉईंग मास्टर अत्तर सिंह यांच्यावर निश्चित करण्यात आली आणि त्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधातही कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
मराठी बातम्या/देश/
Cheque बघून कॅशिअरला आली चक्कर, Drawing शिक्षकाला घरी पाठवले; शिक्षण विभागाची मोठी कारवाई, पुढचा नंबर मुख्याध्यापकांचा
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement