Holi Celebration : गच्चीवर होळी खेळताना संपूर्ण कुटुंब हाय टेंशन वायरच्या संपर्कात; पुढं काय घडलं?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Holi Celebration : दिल्लीतील पांडव नगर भागात होळी खेळणाऱ्या एका कुटुंबाचा अचानक जीव धोक्यात आला होता.
नवी दिल्ली : देशभरात होळीची धामधूम पाहायला मिळत आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत या सणाला गालबोट लागले आहे. होळीच्या उत्सवादरम्यान दिल्लीतील पांडव नगरमध्ये एकाच कुटुंबातील आठ जण हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्वांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सर्वजण घराच्या गच्चीवर पाण्याने होळी खेळत होते. दरम्यान, ते घराच्या वरून जाणाऱ्या हाय टेन्शन वायरच्या अचाकन संपर्कात आले.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होळी खेळणाऱ्या लोकांवर अचानक हाय टेंशन वायर्सची वीज कशी पडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून इतर सहा जखमींमध्ये मुलांचाही समावेश आहे.
advertisement
धुलीवंदनाच्या दिवशी मुंबईत मोठा अपघात
धुलीवंदनाच्या दिवशी माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्र किनाऱ्यावर आलेले पाच जण बुडाले आहेत, यातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. बुडालेल्या युवकाचं नाव यश कागडा असं आहे. यशचा शोध सुरू आहे. बुडालेले सगळे जण महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत. वाचवण्यात आलेल्या चार जणांपैकी दोन जण सुखरूप घरी गेले आहेत, तर दोघांवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेला हर्ष किंजले नावाच्या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर हे पाच युवक नेमके कसे बुडाले याचा शोध घेतला जात आहे.
Location :
Delhi
First Published :
March 25, 2024 10:16 PM IST
मराठी बातम्या/देश/
Holi Celebration : गच्चीवर होळी खेळताना संपूर्ण कुटुंब हाय टेंशन वायरच्या संपर्कात; पुढं काय घडलं?