India China : सीमेवर तणाव, पाकिस्ताननंतर आता चीनला मस्ती, भारताला डिवचलं!

Last Updated:

India China : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तान माज उतरवल्यानंतर आता चीनने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे

News18
News18
नवी दिल्ली : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तान माज उतरवल्यानंतर आता चीनने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने भारताविरोधात आगळीक केली आहे.
चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. या मुद्द्यावर भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने बुधवारी चीनच्या प्रयत्नांना स्पष्टपणे विरोध केला. चीनच्या अशा हास्यास्पद प्रयत्नांनी अरुणाचल प्रदेश भारताचा भूभाग असल्याचे सत्य बदलणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर भारताने चीनला सुनावले. "सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश राज्य भारताचा अविभाज्य भाग होते, आहे आणि राहील, असे भारताने ठणकावले. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांसाठी चीनने आपली नावे जाहीर केल्यावर भारताने आपली संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनचा दावा आहे.
advertisement

अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे - परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "आम्हाला असे आढळून आले आहे की चीनने भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील ठिकाणांची नावे बदलण्याचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न केले आहेत." ते म्हणाले, "आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो."
या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल यांनी ही टिप्पणी केली. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील हे निर्विवाद वास्तव बदलणार नाही, असे त्यांनी म्हटले.
advertisement

भारत-पाकिस्तान तणावात चीनची आगळीक 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर तणाव खूप वाढला आहे. पाकिस्तानने देशातील अनेक ठिकाणी हल्ला करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. आता दुसरीकडे, चीन आपल्या कारवायांपासून मागे हटत नाहीये. त्याने यापूर्वीही अरुणाचल प्रदेशकडे वाईट नजरेने पाहिले होते.
मराठी बातम्या/देश/
India China : सीमेवर तणाव, पाकिस्ताननंतर आता चीनला मस्ती, भारताला डिवचलं!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement