भारतीय नौदलाला मिळाली पहिली महिला फायटर पायलट! कोण आहेत आस्था पुनिया?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आस्था पुनिया भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. ३ जुलै २०२५ रोजी गोव्यातील कार्यक्रमात त्यांना विंग्स ऑफ गोल्डने सन्मानित करण्यात आले.
नारी शक्ती कुणापेक्षाही कमी नाही. नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण आला आहे. नौदलाला पहिली महिला फायटर पायलट मिळाली आहे. आस्था पुनिया यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्या सब-लेफ्टनंट म्हणून नौदलाच्या पहिल्या फायटर पायलट बनल्या आहेत. ही फक्त नौदलासाठीच नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आतापर्यंत भारतीय नौदलात महिला टोही विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्याची जबाबदारी सांभाळत होत्या, परंतु आस्था पुनिया या पहिल्या महिला आहेत, ज्या लढाऊ विमान उडवतील. भारतीय नौदलाने ३ जुलै २०२५ रोजी एका विशेष कार्यक्रमात ही माहिती दिली. गोवा येथील इंडियन नेव्हल एअर स्टेशनवर दुसऱ्या बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्सच्या समारोप समारंभात आस्था पुनिया यांना त्यांचे सहकारी लेफ्टनंट अतुल कुमार धुल यांच्यासोबत प्रतिष्ठित विंग्स ऑफ गोल्डने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना रिअर ॲडमिरल जनक बेवली (ACNS, एअर) यांनी प्रदान केला.
advertisement
या प्रसंगी नौदलाने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. नेव्हल एव्हिएशनमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला असून आस्था या पहिल्या महिल्या फायटर पायलट असणार आहेत असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. नौदलाच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे तर आस्था यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
A New Chapter in Naval Aviation#IndianNavy marks a historic milestone with the graduation of the Second Basic Hawk Conversion Course on #03Jul 2025 at @IN_Dega.
Lt Atul Kumar Dhull and Slt Aastha Poonia received the prestigious 'Wings of Gold' from RAdm Janak Bevli, ACNS (Air).… pic.twitter.com/awMUQGQ4wS
— SpokespersonNavy (@indiannavy) July 4, 2025
advertisement
सध्या आस्था यांना कोणते फायटर एअरक्राफ्ट सोपवले जाईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, भारतीय नौदलाकडे काही खास लढाऊ विमाने आहेत, ज्यात मिग-२९K प्रमुख आहे. ही फायटर जेट्स आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत यांसारख्या एअरक्राफ्ट कॅरियर्सवरून उड्डाण करू शकतात.
मिग-२९K ची प्रमुख वैशिष्ट्ये:
कॉम्बॅट रेंज: ७२२ किलोमीटर
नॉर्मल रेंज: २३४६ किलोमीटर
advertisement
शस्त्र क्षमता: ४५० किलोग्रामपर्यंतचे बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. ही फायटर जेट्स विशेषतः सागरी मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहेत.
ज्यांना संरक्षण दलात आपलं करियर करायचं आहे त्यांच्यासाठी आस्था पुनिया अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणा असणार आहेत. सब-लेफ्टनंट आस्था पुनिया यांनी असा इतिहास रचला आहे, जो येणाऱ्या पिढ्या अभिमानाने लक्षात ठेवतील. भारतीय नौदलाने महिलांना मुख्य प्रवाहात आणून देशाची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 04, 2025 1:29 PM IST