EXCLUSIVE : भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचं सरेंडर, DGMO ने फोन करून गुडघे टेकले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान यांच्यातली युद्धजन्य परिस्थिती मावळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातली युद्धजन्य परिस्थिती मावळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानचं सरकार आणि लष्कराने सरेंडर केल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ म्हणजेच लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक यांनी दुपारी भारतासोबत संपर्क साधला आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संवाद झाला. या चर्चेअंती शस्त्रसंधीवर परस्पर सहमती झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओकडून संपर्क झाल्याचं भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव एफएस मिस्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली शस्त्रसंधी कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीशिवाय थेट भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेतून ठरली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. सध्या इतर कोणत्याही इतर मुद्द्यांवर किंवा तटस्थस्थळी चर्चा होणार नाही, असा कोणताही निर्णय झालेला नाही, असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानचे डीजीएमओ आणि भारताच्या डीजीएमओ यांच्यात फोनवरून संपर्क झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली. हा निर्णय सीमावर्ती भागात शांती आणि स्थिरतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट
दरम्यान काही वेळापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारत-पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी झाल्याचं सांगितलं. भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीस सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
May 10, 2025 6:25 PM IST
मराठी बातम्या/देश/
EXCLUSIVE : भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचं सरेंडर, DGMO ने फोन करून गुडघे टेकले!