Vice President Election 2025 : भारतात उपराष्ट्रपती निवडण्याचे नियम आणि प्रक्रिया काय आहे? ते केव्हा निवडले जातात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Vice President Election 2025 : या सगळ्यात अनेकांना असा प्रश्न पडला असेल की ही प्रक्रिया अशी मधेच कशी झाली किंवा या पदासाठी कोण आणि कशी करतं निवड? चला याबद्दल सविस्तर समजून घेऊ.
मुंबई : भारतात उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च घटनात्मक पदाधिकारी मानला जातो. त्यांचे मुख्य कार्य म्हणजे राज्यसभेचे सभापती (Chairman of Rajya Sabha) म्हणून काम पाहणे. भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत. तर उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड़ कामकाज पाहात होते. पण आता या पदासाठी निवडणूक लढवली गेली, त्यानंतर सी पी राधाकृष्णन हे सध्याचे उपराष्ट्रपती झाले आहेत. (Vice President Election 2025)
पण या सगळ्यात अनेकांना असा प्रश्न पडला असेल की ही प्रक्रिया अशी मधेच कशी झाली किंवा या पदासाठी कोण आणि कशी करतं निवड? चला याबद्दल सविस्तर समजून घेऊ.
निवड प्रक्रिया कशी असते?
उपराष्ट्रपतींची निवड भारतीय संविधानाच्या कलम 63 ते 71 मध्ये नमूद केलेल्या नियमांनुसार केली जाते. निवडणूक भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) यांच्या देखरेखीखाली होते. निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा आणि राज्यसभा) सर्व सदस्य सहभागी होतात. यात निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य दोन्ही मतदान करतात. पण राज्य विधानसभांचे सदस्य (MLAs) या निवडणुकीत सहभागी होत नाहीत.
advertisement
मतदान पद्धत कोणती असते?
मतदान गुप्त मतदान पद्धतीने (Secret Ballot) केले जाते. यात एकल हस्तांतरणीय मत (Single Transferable Vote) प्रणालीचा वापर होतो. प्रत्येक खासदाराला प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांना मत द्यावे लागते.
यासाठी पात्रता काय असते? उमेदवार कसा ठरवतात?
यासाठीचा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक असते आणि त्याचे वय किमान 35 वर्षे असावे. लोकसभा सदस्य होण्यास पात्र असणे गरजेचे.
advertisement
कार्यकाळ किती असतो?
उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा निवडून येण्याची संधी असते.
निवड केव्हा होते?
विद्यमान उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. जर पद रिक्त झाले (मृत्यू, राजीनामा किंवा इतर कारणामुळे) तर 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणे बंधनकारक आहे.
शपथ कोण देतो?
उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती शपथ देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 7:48 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Vice President Election 2025 : भारतात उपराष्ट्रपती निवडण्याचे नियम आणि प्रक्रिया काय आहे? ते केव्हा निवडले जातात