विमानतळावर कोरियन युवतीचा लैंगिक छळ, नराधमाने तरुणीला पुरुषांच्या वॉशरुमजवळ नेलं अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारतात फिरायला आलेल्या एका कोरियन युवतीचा विमानतळावर लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
भारतात फिरायला आलेल्या एका कोरियन युवतीचा विमानतळावर लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने तरुणीला निर्जन ठिकाणी घेऊन जात तिचा छळ केला. हा प्रकार घडताच पीडित तरुणीने याबाबतची तक्रार विमानतळ प्रशासनाकडे केली. यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. एका विदेशी तरुणीवर अशाप्रकारे गैरप्रकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना बंगळुरू येथील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. एका खासगी विमान कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने तपासणीच्या बहाण्याने दक्षिण कोरियन तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अफान अहमद (२५) या आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना १९ जानेवारी रोजी बेंगळुरू विमानतळाच्या टर्मिनल २ वर घडली. पीडित दक्षिण कोरियन महिला आपल्या देशात परतण्यासाठी विमानात चढण्यापूर्वी इमिग्रेशन आणि सुरक्षा तपासणीच्या प्रक्रिया पूर्ण करत होती. यावेळी आरोपी मोहम्मद अहमद, जो एअर इंडिया सॅट्स मध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता, त्याने तिला अडवले.
advertisement
आरोपीने महिलेच्या बॅगेतून काहीतरी विचित्र आवाज येत असल्याचा खोटा दावा केला. बॅगेची अधिक सखोल तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगून त्याने तिला मुख्य सुरक्षा क्षेत्रापासून दूर नेले.
वॉशरूमजवळ नेऊन गैरवर्तन
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला जाणीवपूर्वक पुरुषांच्या वॉशरूमजवळील एका निर्जन ठिकाणी जाण्यास भाग पाडले. तिथे गेल्यावर त्याने तपासणीच्या नावाखाली महिलेला अनेक वेळा अयोग्य आणि अनुचित स्पर्श केला. जेव्हा महिलेने या प्रकाराला जोरदार विरोध केला, तेव्हा आरोपीने तिथून पळ काढला. या प्रसंगामुळे हादरलेल्या महिलेने तत्काळ विमानतळ सुरक्षा दलाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
advertisement
आरोपीवर कठोर कारवाई
महिलेच्या तक्रारीनंतर विमानतळ सुरक्षा रक्षकांनी तातडीने हालचाली करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोहम्मद अहमदला ताब्यात घेतले आणि विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर आरोपी कर्मचाऱ्याला तत्काळ नोकरीवरून काढण्यात देखील आलं. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
Jan 23, 2026 8:46 AM IST
मराठी बातम्या/देश/
विमानतळावर कोरियन युवतीचा लैंगिक छळ, नराधमाने तरुणीला पुरुषांच्या वॉशरुमजवळ नेलं अन्...










