advertisement

इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी दिली JIO AI पॅव्हेलियनला भेट

Last Updated:

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष आकाश अंबानी यांनी पंतप्रधानांना जिओच्या व्यापक एआय इकोसिस्टम आणि सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल परिवर्तनाला गती देण्याच्या भूमिकेबद्दल माहिती दिली.

News18
News18
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी एआय इम्पॅक्ट समिटसाठी नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आलेले जागतिक नेते, उद्योगजगतातील अग्रणी, धोरणकर्ते, संशोधक आणि जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तंज्ञांचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये जिओ इंटेलिजेंस पॅव्हेलियनला भेट दिली, जिथे त्यांनी एआय-संचालित मॉडेल्स आणि उपायांचा आढावा घेतला.
advertisement
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये जिओ इंटेलिजेंस पॅव्हेलियनला भेट दिली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिओ एआय स्टॅक, जिओ संस्कृती एआय, जिओ आरोग्य एआय, जिओ शिक्षा आणि जिओ एआय होमचे थेट प्रात्यक्षिक पाहिलं. हे प्लॅटफॉर्म एंटरप्राइझ इंटेलिजेंस चालविण्यासाठी, भारतीय भाषा आणि सांस्कृतिक सामग्रीचा प्रचार करण्यासाठी, आरोग्यसेवा वितरण वाढविण्यासाठी, शिक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि एआय-संचालित स्मार्ट लिव्हिंग सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेलं आहेत.
advertisement
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष आकाश अंबानी यांनी पंतप्रधानांना जिओच्या व्यापक एआय इकोसिस्टम आणि सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल परिवर्तनाला गती देण्याच्या भूमिकेबद्दल माहिती दिली.
"सर्वांसाठी एआय" या जिओच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना, कंपनीने प्रगत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात सुलभ आणि समावेशक बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भर दिला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वी असं म्हटलं आहे की," तंत्रज्ञानाचे खरे मूल्य लोकांना व्यापक आणि समानतेने लाभ देण्याच्या क्षमतेमध्ये आहे."
advertisement
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटनं भारत आणि जगभरातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या, नव निर्माते आणि धोरणकर्त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याचा शोध घेण्यासाठी एकत्र आणलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याा  जिओ पॅव्हेलियनच्या भेटीमुळे देशाच्या एआय लँडस्केपला आकार देण्यात भारताच्या खाजगी क्षेत्राच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
view comments
मराठी बातम्या/देश/
इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी दिली JIO AI पॅव्हेलियनला भेट
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement