advertisement

मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींनी पाठवले समन्स

Last Updated:

खासदार हेमंत पाटील यांना दहा नोव्हेंबर रोजी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेच्या कामकाजातही सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.

खासदार हेमंत पाटील
खासदार हेमंत पाटील
मुंबई, 30 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. आता या प्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत पाटील यांना सन्मन्स बजावले असून ४ डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. मराठा आरक्षणावरून राजीनामा दिल्यानंतर हेमंत पाटील हे ससंदेत गेलेले नाहीत.
खासदार हेमंत पाटील यांना दहा नोव्हेंबर रोजी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेच्या कामकाजातही सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते संसदेच्या कामकाजासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे आता त्यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा शब्द दिलाय. आरक्षण हे मिळालं पाहिजे. समाजाचा कार्यकर्ता या नात्याने आणि समाज तुमच्या सोबत असतो. त्यामुळे लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. पद येतील आणि जातील असं खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देताना म्हटलं होतं.
view comments
मराठी बातम्या/देश/
मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींनी पाठवले समन्स
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement