advertisement

'पोलीस मला मारून टाकतील', विद्यमान खासदाराची आर्त विनवणी, तरी झाली अटक, मध्यरात्री मोठा राडा

Last Updated:

बिहारच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि पूर्णियाचे अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली.

News18
News18
बिहारच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि पूर्णियाचे अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. ३१ वर्षे जुन्या एका प्रकरणात न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेदरम्यान पप्पू यादव यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू यादव शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास लोकसभेचे अधिवेशन संपवून दिल्लीहून पाटण्याला परतले होते. ते घरी पोहोचताच काही वेळात पाटणा पोलिसांनी त्यांच्या घराला वेढा घातला. या कारवाईत ५ पोलीस ठाण्यांचे पथक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता. सिटी एसपी भानु प्रताप सिंह आणि एसएसपी कार्तिकेय शर्मा स्वतः पप्पू यादव यांना अटक करण्यासाठी आले होते.
advertisement
जेव्हा साध्या वेशातील पोलीस अधिकारी त्यांच्या घरात शिरले, तेव्हा पप्पू यादव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "मला मारण्यासाठी हे लोक आले आहेत, हे पोलीस नसून गुंड असावेत, असा मला संशय आहे," असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. बराच वेळ चाललेल्या या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पप्पू यादव यांच्यावरील ही कारवाई ३१ वर्षांपूर्वीच्या (१९९५) एका जुन्या खटल्याशी संबंधित आहे. घरमालक विनोद बिहारी लाल यांनी ही तक्रार दाखल केली होती. पप्पू यादव यांनी वैयक्तिक वापरासाठी घर भाड्याने घेतले, परंतु तिथे राजकीय कार्यालय सुरू केले. जेव्हा घरमालकाने विरोध केला, तेव्हा त्यांना धमकावण्यात आले आणि फसवणूक करण्यात आली, असा आरोप पप्पू यादव यांच्यावर आहे.
advertisement
हे प्रकरण सध्या खासदार-आमदार (MP-MLA) विशेष न्यायालयात सुरू आहे. वारंवार समन्स बजावूनही पप्पू यादव न्यायालयात हजर झाले नाहीत, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. अटकेनंतर पप्पू यादव यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "मी नुकताच नीट (NEET) परीक्षेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि गर्ल्स हॉस्टेलमधील समस्यांबाबत सरकारला जाब विचारला होता. माझा आवाज दाबण्यासाठी हे राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. पोलिसांनी मला अटकेचे वॉरंट न दाखवता केवळ मालमत्ता जप्तीची नोटीस दाखवली."
advertisement

बिहारच्या राजकारणात खळबळ

पप्पू यादव यांच्या अटकेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून, आज (शनिवार) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांना जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
'पोलीस मला मारून टाकतील', विद्यमान खासदाराची आर्त विनवणी, तरी झाली अटक, मध्यरात्री मोठा राडा
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement