Sonam Raghuvanshi : हत्या, प्रेमसंबंध आणि आता प्रेग्नन्सी? सोनम रघुवंशी प्रकरणात नवीन ट्विस्ट!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची पत्नी आणि हत्येची आरोपी सोनम रघुवंशी ही गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता, या प्रकरणात तिचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे.
Sonam Raghuvanshi Pregnancy News: इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहेत. राजा रघुवंशीची पत्नी आणि हत्येची आरोपी सोनम रघुवंशी ही गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता, या प्रकरणात तिचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे.
हनिमूनसाठी शिलाँग गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला होता. तर, सोनमचा थांगपत्ता लागला नव्हता. 23 मे पासून राजा बेपत्ता होता. तर, 2 जून रोजी त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात राजाची हत्या झाल्याचे समोर आले होते. मात्र, सोनम बेपत्ता असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले. पोलिसांकडून सोनमचा शोध सुरू होता. अखेर तिने घरच्या लोकांना फोन करून आपलं लोकेशन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत तिला अटक केली.
advertisement
सोनम रघुवंशीवर तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट आणि हत्येचा आरोप आहे. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत राजाच्या हत्येचा कट रचला असल्याचे समोर आले. राजाला संपवण्यासाठी त्याची सुपारी दिली गेल्याचा आरोप आहे.
सोनम प्रेग्नेंट आहे का?
सोनम रघुवंशीच्या गरोदरपणाबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. म्हणूनच ९ जून रोजी जेव्हा सोनमला गाजीपूरमधून पकडण्यात आले तेव्हा तिची गर्भधारणा चाचणी प्रथम करण्यात आली. सोनम प्रेग्नेंट आहे का, याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय चाचणीनुसार, सोनमही गरोदर नसल्याचे समोर आले आहे. तिची चाचणी निगेटिव्ह आली.
advertisement
सोनम रघुवंशी यांची वैद्यकीय तपासणी सोमवार, 9 जून 2025 रोजी पूर्ण झाली. तीन डॉक्टरांच्या पथकाने तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती तपासत तिची कसून तपासणी केली. डॉक्टरांच्या मते, सोनम अत्यंत घाबरलेली आणि धक्कादायक स्थितीत दिसत होती. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिला अशक्त वाटत असल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर तिला सकाळभर तिला एनर्जी ड्रिंक्स आणि ज्यूस देण्यात आले.
advertisement
सोनम प्रेग्नेन्सी चाचणी निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांनी एका आठवड्यानंतर फॉलो-अप अल्ट्रासाऊंड करण्याची शिफारस केली. त्यांनी नमूद केले की तातडीने केलेल्या काही गर्भधारणा चाचण्यांमध्ये अस्पष्ट निकाल येणे सामान्य आहे. प्रेग्नेन्सीच्या स्पष्टतेसाठी आणखी काही दिवस वाट पाहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
मेघालय पोलिसांनी घेतलं ताब्यात...
दरम्यान, वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मेघालय पोलिसांनी सोनमला त्यांच्या ताब्यात घेतले. आता तिला पुढील चौकशीसाठी आणि प्रकरणाच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करण्यासाठी मेघालयात नेण्यात आले आहे.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 11, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/देश/
Sonam Raghuvanshi : हत्या, प्रेमसंबंध आणि आता प्रेग्नन्सी? सोनम रघुवंशी प्रकरणात नवीन ट्विस्ट!