Ratan Tata: मृत्यूनंतर कोणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात? काय आहेत नियम?

Last Updated:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, भारताचे रत्न रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, कोणत्या लोकांना मृत्यूनंतर तिरंग्यात लपेटून त्यांचा सन्मान केला जातो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, भारताचे रत्न रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, भारताचे रत्न रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. मुंबईतील कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून नेते, अभिनेते, उद्योगपती येत आहेत. रतन टाटा यांचं पार्थिव दर्शनासाठी मुंबईतल्या एनसीपीएमध्ये ठेवण्यात आलं होतं. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येत आहे.
रतन टाटा यांचे अधिकृत निवासस्थान कुलाब्यातील सॉमरसेट हाऊस इथं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, भारताचे रत्न रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या घराबाहेर रतन टाटा यांच्या पार्थिवाला तिरंग्यामध्ये लपेटले गेले. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, कोणत्या लोकांना मृत्यूनंतर तिरंग्यात लपेटून त्यांचा सन्मान केला जातो.
advertisement
रतन टाटांना भारतरत्न द्या, जोरदार मागणी, आजवर कोणाकोणाला मिळाला हा मरणोत्तर पुरस्कार?
जेव्हा एखादा सैनिक शहीद होतो तेव्हा त्याला भारताच्या तिरंग्यात लपेटून शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्याचबरोबर सीआरपीएफ, बीएसएफ, पोलिस शहीद झाल्यानंतर त्यांनाही तिरंग्यात लपेटून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. याशिवाय काही विशेष प्रसंगी सरकारी अधिकारी, तसेच कर्मचारी यांचे देशाची सेवा करताना निधन झाल्यास त्यांच्यावरही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. तथापि याबाबतच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याआधी राजकारणी किंवा सैन्याचे सैनिक यांनाच त्यांच्या निधनानंतर तिरंग्यामध्ये लपेटण्याचा सन्मान मिळतो. मात्र आता व्यक्तीचे पद आणि त्याने देशासाठी काय केले आहे हे पाहून त्यांना हा सन्मान दिला जातो. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, उद्योग आणि मनोरंजन या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या मृत्यूनंतर हा सन्मान दिला जातो.
advertisement
रतन टाटा हे त्यांच्या दानशूर स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी वेळोवेळी लोकांच्या भल्यासाठी अनेक काम केली आहेत. इतकंच नाही तर त्यांनी लोकांचे जीवन वाचवण्यासाठी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग दान केला होता. कोरोना काळात देश अनेक समस्यांशी झुंज देत होता. अशा परिस्थितीत टाटा समूहाने देशासाठी तब्बल १५०० कोटी रुपये दान केले होते. टाटा ट्रस्टचे प्रवक्ते देवाशिष राय यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य परिस्थितीत, टाटा समूहाद्वारे चालवला जाणारा ट्रस्ट दरवर्षी चॅरिटीसाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च करतो. त्याचबरोबर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टाटा समूह नेहमीच पुढे राहिला आहे. रतन टाटा आपल्या कमाईतील मोठा हिस्सा चॅरिटीसाठी दान करायचे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Ratan Tata: मृत्यूनंतर कोणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात? काय आहेत नियम?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement