रतन टाटांना भारतरत्न द्या, जोरदार मागणी, आजवर कोणाकोणाला मिळाला हा मरणोत्तर पुरस्कार?

Last Updated:

आज आपण जाणून घेऊया की भारतात याआधी कोणकोणत्या लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.

आज आपण जाणून घेऊया की भारतात याआधी कोणकोणत्या लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
आज आपण जाणून घेऊया की भारतात याआधी कोणकोणत्या लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
मुंबई: भारताचे लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात दुःखाचे वातावरण आहे. रतन टाटा आणि संपूर्ण टाटा समूहाने व्यापाराआधी देशाला प्राधान्य दिले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात देशासाठी जे काही केले आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. याच प्रेमापोटी आता संपूर्ण देशातून रतन टाटा यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा यासाठी मागणी करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते राहुल कनौल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याबाबत आग्रह केला आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “रतन टाटा यांना भारतरत्न देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव ठेवावा.” याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊया की भारतात याआधी कोणकोणत्या लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कोणत्याही क्षेत्रात असाधारण सेवा करणाऱ्या लोकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासाठी जाती, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. १९५४ साली भारतरत्नची स्थापना करण्यात आली होती. चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सर्वप्रथम भारतरत्न देण्यात आला होता. तर इंदिरा गांधी या भारतरत्न मिळणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
advertisement
ऑलिंपिक ते क्रिकेट, भारतीय खेळाडूंसाठी ‘टाटा’ ठरले तारणहार, वेळोवेळी अशी केली मदत
जिवंत लोकांबरोबरच काही मृत व्यक्तींनाही भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मृत्यूनंतर भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आलेले पहिले व्यक्ती लाला लजपतराय हे होते. ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते, तर १९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी भारताला विजय मिळवून दिला होता. त्याच्या व्यतिरिक्त करपुरी ठाकुर, चौधरी चरण सिंग, एम. एस. स्वामिनाथन, सर्वपल्ली राधाकृष्णन, बाबासाहेब आंबेडकर, महर्षि दयानंद सरस्वती, राजकुमार सान्याल यांच्यासह १८ लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
advertisement
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यामागचा उद्देश असा की संबंधित लोकांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना प्रोत्साहन देणे. भारतरत्नचा हा सन्मान केवळ प्राप्तकर्त्यासाठीच नाही तर त्याच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठीही अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार भारतीय संस्कृती आणि समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वारशाचा एक भाग आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
रतन टाटांना भारतरत्न द्या, जोरदार मागणी, आजवर कोणाकोणाला मिळाला हा मरणोत्तर पुरस्कार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement