Road Accident: रात्री 2 वाजता काळाची झडप! ट्रॅक्टरला चिरत गेला कंटेनर, 8 जणांचा मृत्यू 50 जखमी

Last Updated:

Bulandshahr Road accident: बुलंदशहर जिल्ह्यात अरनिया परिसरात कंटेनर आणि ट्रॅक्टर-ट्रॉली अपघातात 8 मृत्यू, 50 जखमी. श्रुती, दिनेश कुमार सिंह, कलानिधी नैथानी यांनी घटनास्थळी तपास केला.

फोटो सौजन्य- ANI
फोटो सौजन्य- ANI
रात्री 2 वाजता काळानं झडप घातली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरधाव कंटेनर भाविकांनी भरलेला ट्रॅकर चिरत गेला. या भीषण अपघातात 50 जण जखमी झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं जखमींना रुग्णालयात दाखल केलं. भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून येणाऱ्या वेगवान कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अरनिया पोलीस ठाणे परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर घटाल गावाजवळ रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. कासगंज जिल्ह्यातील सोरों पोलीस ठाणे क्षेत्रातील रफातपूर आणि मिलकिनिया येथील सुमारे 60 भाविक ट्रॅक्टर-ट्रॉलीतून राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील गोगामेड़ी येथे जहारवीर बाबांच्या दर्शनासाठी जात होते. जखमींना तत्काळ जटिया रुग्णालय, कैलाश रुग्णालय आणि अरनिया येथील मुनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
अपघातातील मृतांची ओळख पटली असून त्यांची नावे समोर आली आहेत
चांदनी (12), कन्या कालीचरण, रफातपूर, सोरों, कासगंज
रामबेटी (65), पत्नी सोरनसिंह, रफातपूर, सोरों, कासगंज
ईयू बाबू (40), ट्रॅक्टर चालक, मिलकिनिया, सोरों, कासगंज
धनीराम, मिलकिनिया, सोरों, कासगंज
मोक्षी (40), मिलकिनिया, सोरों, कासगंज
शिवांश (06), पुत्र अजय, मिलकिनिया, सोरों, कासगंज
विनोद (45), पुत्र सोरनसिंह, रफातपूर, सोरों, कासगंज
advertisement
योगेश (50), पुत्र रामप्रकाश, रफातपूर, सोरों, कासगंज
advertisement
जखमींच्या उपचारासाठी रुग्णालयात पोहोचून जिल्हाधिकारी श्रुती आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. एडीएम प्रमोद कुमार पांडेय, एसपी नगर शंकर प्रसाद, एसपी ग्रामीण डॉ. तेजवीर सिंह, एसडीएम प्रतीक्षा पांडेय, सीओ पूर्णिमा सिंह यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. मेरठ मंडळाचे आयुक्त डॉ. हृषिकेश भास्कर यशोद आणि डीआयजी कलानिधी नैथानी यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
view comments
मराठी बातम्या/देश/
Road Accident: रात्री 2 वाजता काळाची झडप! ट्रॅक्टरला चिरत गेला कंटेनर, 8 जणांचा मृत्यू 50 जखमी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement