स्वस्तात मस्त भारतातील खास पर्यटनस्थळं, पाहा कोणकोणती आहेत

Last Updated:

पर्यटनासाठी फिरण्याची आवड, वेळ आणि पैसाही गरजेचा असतो. परदेशात जायचं असेल, तर नक्कीच भरपूर बजेट ठेवावं लागतं; मात्र भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांना निसर्गाचं मोठं वरदान लाभलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट :  पर्यटनासाठी फिरण्याची आवड, वेळ आणि पैसाही गरजेचा असतो. परदेशात जायचं असेल, तर नक्कीच भरपूर बजेट ठेवावं लागतं; मात्र भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांना निसर्गाचं मोठं वरदान लाभलं आहे; पण अतिशय कमी बजेटमध्ये तिथे जाता येऊ शकतं. या ठिकाणी फिरण्यासाठी केवळ फिरण्याची आवड गरजेची असते. अगदी 10 हजार रुपयांमध्येसुद्धा फिरता येईल अशा काही ठिकाणांची माहिती घेऊ या. ‘न्यूजेबल एशियानेट न्यूज’ने त्याबद्दल माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
तवागं, अरुणाचल प्रदेश - भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांना भरपूर निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे. त्यापैकीच एक राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. इथलं तवांग हे ठिकाण तिथल्या सुंदर मॉनेस्ट्रीसाठी परिचित आहे. ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी मॉनेस्ट्री आहे. अगदी चित्रात शोभून दिसतील अशी दृष्य इथे पाहायला मिळतात. शांत, संथ पाण्याची सरोवरं आणि स्थानिक मोनापा संस्कृतीच्या खुणा तुमचं मन आकर्षित करतात.
advertisement
कौसानी, उत्तराखंड - भारताच्या उत्तराखंड राज्यात असलेलं कौसानी हे ठिकाण हिमालयाच्या कुशीत वसलेलं आहे. नंदादेवी आणि त्रिशूळ यांसह हिमालयाच्या अनेक शिखरांचा मनमोहक नजारा इथून डोळ्यांत साठवता येतो. निसर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी, बाइक रायडिंग करणाऱ्यांसाठी आणि शांततेचा अनुभव घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे नक्कीच सुंदर ठिकाण आहे. या भागात असलेल्या अनशक्की आश्रमाला अनेक पर्यटक भेट देतात. इथे महात्मा गांधी यांनी काही काळ वास्तव्य केलं होतं.
advertisement
माथेरान, महाराष्ट्र - महाराष्ट्र राज्यातलं माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे ठिकाण प्रदूषणापासून मुक्त आहे. इथली घोड्यावरची सैर व टॉय ट्रेनची सफर हे पर्यटकांचं आकर्षण आहे. चार्लोट तलाव आणि लुइसा पॉइंट ही आवर्जून भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत.
झिरो, अरुणाचल प्रदेश - अरुणाचल प्रदेशात असलेलं झिरो खोरं हे आणखी एक पर्यटनस्थळ आहे. इथले सांस्कृतिक सण, संगीत महोत्सव पर्यटकांच्या पसंतीस उतरतात. या भागात आपटानी जमातीची वस्ती आहे. या भागात पर्यटक ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण या गोष्टींचाही आनंद घेऊ शकतात.
advertisement
स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश - या भागात जुन्या मोनॅस्टरीज आणि निसर्गाचं मनोहारी दृश्य पाहायला मिळतं. पर्यटकांना इथे सुंदर सांस्कृतिक अनुभव मिळू शकतो. इथलं चंद्रतळ सरोवर पर्यटकांचं विशेष आवडतं आहे. त्याशिवाय टॅबो आणि धंकर मोनॅस्टरीजही पाहण्यासारख्या आहेत.
नुब्रा व्हॅली, लडाख - लडाखमधलं नुब्रा खोरं सुंदर प्रदेश म्हणून आणि दोन कुबड असणाऱ्या उंटांसाठी ओळखलं जातं. या प्रवासात खार्दुंग-ला पास ओलांडता येते. त्याशिवाय डिस्कीट मोनॅस्टरी आणि Panamik इथल्या गरम पाण्याच्या झऱ्यांचा आनंद घेता येऊ शकतो.
advertisement
खज्जियार, हिमाचल प्रदेश - या ठिकाणाला भारतातलं मिनी स्वित्झर्लंड असंही म्हटलं जातं. हिरवी, सुंदर कुरणं आणि त्याच्या भोवताली असलेलं दाट जंगल हे या भागाचं वैशिष्ट्य आहे. हे थंड हवेचं ठिकाण आहे. खज्जी नाग मंदिर आणि जवळच असलेलं चमेरा सरोवर ही पर्यटकांसाठीची आकर्षणकेंद्रं आहेत.
भारतातली ही ठिकाणं केवळ निसर्गसौंदर्याचा आनंद देत नाहीत, तर तिथे जाणं खिशालाही परवडू शकतं.
मराठी बातम्या/देश/
स्वस्तात मस्त भारतातील खास पर्यटनस्थळं, पाहा कोणकोणती आहेत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement