अचानक उसळली समुद्राची लाट, माणसांसह गाड्याही गेल्या वाहून, पाहा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
समुद्र जेवढा पहायला सुंदर आणि निळाभोर वाटतो तेवढाच तो खवळल्यावर रौद्र रुप धारण करतो. त्यामुळे त्याच्या जवळ जाणं जेवढं छान आहे तेवढंच धोकादायकही आहे.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : समुद्र जेवढा पहायला सुंदर आणि निळाभोर वाटतो तेवढाच तो खवळल्यावर रौद्र रुप धारण करतो. त्यामुळे त्याच्या जवळ जाणं जेवढं छान आहे तेवढंच धोकादायकही आहे. समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे अनेक धोकादायक घटना घडतात. समुद्राच्या आसपास नेहमीच मोठ्या लाटांचा, पूर येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. समुद्राच्या लाटेत अनेक लोक, वस्तू वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या समुद्राच्या लाटेत रस्त्यावरील गाड्या आणि लोक वाहून गेल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
अचानक उसळलेल्या लाटेत रस्त्यावरील लोक, गाड्या, वाहून गेल्या. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समुद्राला लागून असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. केवळ कार आणि बसच नाही तर अनेक दुचाकीही रस्त्यावर धावत आहेत. रस्त्याच्या कडेला एक समुद्र असून उंच लाटा उसळत आहेत. सर्व वाहने आपापल्या मार्गाने जात असताना समुद्रातून अतानक भीषण लाट उसळते. या लाटेमुळे रस्त्यावरून पायी जाणारे अनेक लोक आणि दुचाकीस्वार अचानक वाहून जाऊ लागतात. अचाकन घडलेल्या या घटनेनं सर्वच सुन्न होतात. लाट एवढी वेगानं होतं की लोकांना त्यांच्या गांड्यासह वाहून नेलं.
advertisement
maldives
— Gurpreet Garry Walia (@GarryWalia_) August 6, 2023
@GarryWalia_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मालदीवचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 6 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2023 11:23 AM IST