Tirupati : तिरुपती दर्शन आता झटपट! ना तासनतास रांग ना Online ची कटकट, जाणून घ्या खास मार्ग
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर ऑनलाईन तिकीट मिळालं नाही, तर मोफत दर्शनाच्या रांगेत उभं राहून 10-15 तास कधी निघून जातात हे समजतही नाही. अशा वेळी अनेक भाविक दर्शनाशिवाय माघारी फिरतात. पण तुम्हाला माहित आहे का? तासनतास रांगेत न उभे राहता आणि महिनाभर आधी बुकिंग न करताही बालाजीचं दर्शन घेता येऊ शकतं. कसं? जाणून घेऊया ही खास माहिती.
मुंबई : "व्यंकटरमणा गोविंदऽऽ गोविंदऽऽ..." या नामघोषाने तिरुमाला पर्वत दुमदुमून जातो. वर्षातील 365 दिवस लाखो भाविक आपल्या लाडक्या सावळ्या परब्रह्माचं, म्हणजेच तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशात गर्दी करतात. पण, तिरुपतीला जाण्याचं नियोजन करणं हे एखाद्या मोठ्या प्रोजेक्टपेक्षा कमी नसतं.
300 रुपयांचे विशेष दर्शन तिकीट मिळवण्यासाठी दोन-दोन महिने आधी कॉम्प्युटरसमोर बसून सगळे बुकिंग्स करावे लागतात. जर ऑनलाईन तिकीट मिळालं नाही, तर मोफत दर्शनाच्या रांगेत उभं राहून 10-15 तास कधी निघून जातात हे समजतही नाही. अशा वेळी अनेक भाविक दर्शनाशिवाय माघारी फिरतात. पण तुम्हाला माहित आहे का? तासनतास रांगेत न उभे राहता आणि महिनाभर आधी बुकिंग न करताही बालाजीचं दर्शन घेता येऊ शकतं. कसं? जाणून घेऊया ही खास माहिती.
advertisement
ऑनलाईन तिकीट हाऊसफुल्ल? मग 'हा' पर्याय वापरा
तिरुपती देवस्थानच्या (TTD) वेबसाईटवर तिकीटं येताच काही मिनिटांत ती संपतात. ज्यांना तिकीट मिळत नाही, ते तिरुमालामध्ये जाऊन 'सर्व दर्शन'चा टोकन घेतात, पण तिथेही टोकनसाठी 5-6 तास लागतात. अशा वेळी राज्य परिवहन मंडळाच्या (RTC) बसेस तुमच्या मदतीला धावून येतात.
बस तिकीट काढा आणि 300 रुपयांचं दर्शन तिकीट मिळवा
आंध्रप्रदेश (APSRTC) आणि तेलंगणा (TSRTC) राज्य परिवहन महामंडळाने भाविकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे. जर तुम्ही तिरुपतीला जाण्यासाठी या सरकारी बसेसचं तिकीट बुक केलं, तर तुम्हाला बसच्या तिकिटासोबतच श्रीवारी दर्शनाचं 300 रुपयांचं तिकीटही उपलब्ध करून दिलं जातं.
advertisement
TSRTC ची विशेष सोय: तेलंगणाच्या विविध भागांतून तिरुपतीला जाणाऱ्या बसेसमध्ये दररोज 1000 भाविकांना हे 300 रुपयांचे विशेष दर्शन तिकीट दिले जात आहे.
जिथे ऑनलाईन बुकिंगसाठी 2 महिने वाट पाहावी लागते, तिथे आरटीसी बसच्या माध्यमातून तुम्ही प्रवासाच्या अवघ्या 5 ते 6 दिवस आधी बुकिंग करून दर्शनाचं तिकीट मिळवू शकता.
बुकिंग कसं करायचं?
भाविकांना हे विशेष दर्शन तिकीट महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून बुक करता येईल.
advertisement
1. www.tsrtconline.in या वेबसाईटला भेट द्या.
2. बस प्रवासाचं तिकीट बुक करताना तिथे उपलब्ध असलेल्या 'Special Entry Darshan' चा पर्याय निवडा.
3. बसचं भाडं आणि दर्शनाचे 300 रुपये भरून तुमचं बुकिंग कन्फर्म करा.
तिरुमालामध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात 70,366 भाविकांनी दर्शन घेतले असून, 4.32 कोटी रुपयांची विक्रमी देणगी हुंडीत जमा झाली आहे. अशा गर्दीच्या काळात 'बस दर्शन' हा पर्याय भाविकांसाठी खरोखरच वरदान ठरत आहे.
advertisement
टीटीडीने आता तिरुमालामध्ये 'चेहरा ओळखण्याची यंत्रणा' (Facial Recognition System) लागू केली आहे, त्यामुळे एकाच तिकिटावर दुसऱ्या व्यक्तीला दर्शन घेणं आता अशक्य आहे. त्यामुळे अधिकृत मार्गानेच आपले तिकीट बुक करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 5:29 PM IST
मराठी बातम्या/देश/
Tirupati : तिरुपती दर्शन आता झटपट! ना तासनतास रांग ना Online ची कटकट, जाणून घ्या खास मार्ग










