निवडणुकीचं तिकिट देतो म्हणून 2 कोटींना फसवलं, केंद्रीय मंत्र्याच्या भावाला अटक

Last Updated:

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला बंगळुरू पोलिसांनी महाराष्ट्रातून अटक केलीय. माजी आमदाराच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला पोलिसांनी बंगळुरू पोलिसांनी महाराष्ट्रातून अटक केली आहे. प्रल्हाद जोशी यांचा भाऊ गोपाल जोशी याच्यासह इतर दोघांवर बंगळुरूत तक्रार दाखल केली होती. जेडीएसचे माजी आमदार देवानंद यांच्या पत्नी सुनिता चव्हाण यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गोपाल जोशी यांच्यासह तिघांना अटक केलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीवेळी गोपाल जोशीने महिलेकडून २ कोटी रुपये घेतले होते. पतीला निवडणुकीत तिकिट देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण तिकीट दिलं नाही. पैसे परत मागितले तेव्हा अपमान केला. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि एससीएसटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार गोपाल जोशीने आपला भाऊ केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
गोपाळ जोशी, त्यांची बहीण विजयालक्ष्मी जोशी आणि गोपाळ यांचा मुलगा अजय जोशी यांच्याविरोधात बसवेश्वरनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री एफआयआर दाखल केला होता. माजी आमदार देवानंद फुलसिंह चव्हाण यांच्या पत्नीने गोपाळ जोशी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या सर्व प्रकारावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही खुलासा केला आहे. प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, नोव्हेंबर २०१३ मध्ये मी सीटी सिव्हील कोर्ट बंगळुरूत एक गुन्हा दाखल केला होता. त्यात म्हटलं होतं की गोपाल जोशी आणि माझे संबंध २० वर्षांपूर्वीच संपले आहेत. आता ३२ वर्षे झालं आमचा संबंध नाही. माझे फक्त दोन भाऊ आहेत आणि कोणीही बहीण नाही. विजयालक्ष्मी जोशी हिचा माझी बहीण म्हणून उल्लेख पूर्ण चुकीचा आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
निवडणुकीचं तिकिट देतो म्हणून 2 कोटींना फसवलं, केंद्रीय मंत्र्याच्या भावाला अटक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement