अलास्का बैठकीनंतरची मोठी बातमी, पुतिन यांचा एक कॉल; जागतिक राजकारणात खळबळ, ट्रम्पच्या नेतृत्वाला झटका

Last Updated:

Vladimir Putin Call PM Modi: युक्रेनमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये बैठक झाली. त्यानंतर पुतिन यांनी थेट पंतप्रधान मोदींशी चर्चा करून त्यांना या बैठकीची माहिती दिली.

News18
News18
नवी दिल्ली: रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला. अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत युक्रेन युद्धावर झालेल्या त्यांच्या बैठकीतील चर्चा त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत शेअर केले.
पुतिन यांचे आभार मानत पंतप्रधान मोदींनी भारत नेहमीच संघर्ष मिटवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा, मुत्सद्देगिरी आणि संवाद या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. भारत या संदर्भात होत असलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो, असेही त्यांनी सांगितले.
या दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी (Special and Privileged Strategic Partnership) अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवरही चर्चा केली.
advertisement
युक्रेन युद्धावर कोणताच तोडगा निघाला नाही
पुतिन यांनी शुक्रवारी अलास्कामध्ये ट्रम्प यांच्यासोबत तीन तास चर्चा केली होती. मात्र या शिखर परिषदेतून युक्रेनमधील युद्धबंदीबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. या युद्धामुळे हजारो लोक मरण पावले आहेत आणि युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
दरम्यान सोमवारी ट्रम्प हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि इतर अनेक युरोपीय नेत्यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये तातडीची युद्धबंदी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. एक थेट शांतता करारच या युद्धाचा अंत करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
advertisement
भारताची अधिकृत भूमिका
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करण्यापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले होते की- भारत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर परिषदेचे स्वागत करतो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, शांततेच्या प्रयत्नांतील त्यांचे नेतृत्व अत्यंत प्रशंसनीय आहे. शिखर परिषदेत झालेल्या प्रगतीचे भारत कौतुक करतो. यावरील पुढील मार्ग केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीतूनच काढला जाऊ शकतो. जगाला युक्रेनमधील संघर्ष लवकर संपलेला पाहायचा आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
अलास्का बैठकीनंतरची मोठी बातमी, पुतिन यांचा एक कॉल; जागतिक राजकारणात खळबळ, ट्रम्पच्या नेतृत्वाला झटका
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement