आजोबा मिल्ट्रीत, नवरा आर्मी ऑफिसर, १७ वर्षांची असताना सैन्यात भरती, देशात चर्चा असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?

Last Updated:

Sofia Qureshi: भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

सोफिया कुरेशी
सोफिया कुरेशी
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांतातील एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सांगितले लष्कराकडून सांगण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील ५ अतिरेकी अड्ड्यांवर तर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ४ अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने क्षेपणास्त्र डागत हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरोधात केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती दिली. या दोन्ही अधिकारी कोण आहेत? याबद्दलची चर्चा समाजमाध्यमांवर वेगाने होते आहे.

कर्नल सोफिया कुरेशीने संपूर्ण भारताला 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली

advertisement
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग, या दोन्ही महिला अधिकारींनी भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य हे जगासमोर मांडले. यासोबतच पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा भारतीय सैन्य कशा पद्धतीने खात्मा करीत आहे, हे उदाहरणासह पटवून दिले.
या दोन महिला अधिकाऱ्यांची चर्चा सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. प्रत्येक भारतीय नागरिक त्यांचे कौतुक करत आहे. सोफिया कुरेशी एक्सवर ट्रेंड करत आहे तसेच विंग कमांडर व्योमिका सिंगचेही विशेष कौतुक होत आहे. या दोघी नारी शक्तीचे प्रतिक असल्याचे लोक म्हणत आहेत.
advertisement
सोफिया कुरेशीचे आजोबाही सैन्यात होते. गुजरातची रहिवासी असलेली सोफिया बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर आहे. सोफिया १९९९ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भारतीय सैन्यात सामील झाली. त्यावेळी ती फक्त १७ वर्षांची होती. सोफिया ही लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समध्येही अधिकारी होती. सोफियाला लष्करी सेवेची पार्श्वभूमीची आहे, तिचे आजोबाही सैन्यात होते. तिचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये आर्मी ऑफिसर आहेत.
advertisement

कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या?

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत हवाई हल्ल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, "निरपराध पर्यटकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पाकिस्तान गेल्या तीन दशकांपासून दहशतवादाचे पालन पोषण करतो आहे. तसेच त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांना पोसण्याचे काम करतोय. पाकिस्तान आणि पीओके त्यांच्यासाठी बांधलेल्या इमारती आहेत. त्याच नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून आम्ही ते नष्ट केले आहेत, असे कर्नल सोफिया यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांमध्ये, पाकिस्तानने पद्धतशीरपणे दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, ज्यामध्ये दहशतवादी छावण्या आणि लाँचपॅड आहेत. उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथील प्रसिद्ध प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य करण्यात आले.
advertisement

विंग कमांडर व्योमिका सिंह काय म्हणाल्या...?

ब्रीफिंग देताना विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या की, ठोस गुप्तचर माहितीनंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथे लष्करच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांचा कणा मोडण्यासाठी कारवाई करण्यात आली. बर्नाळा कॅम्प देखील पाडण्यात आला. सियालकोटमधील महमूना कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/देश/
आजोबा मिल्ट्रीत, नवरा आर्मी ऑफिसर, १७ वर्षांची असताना सैन्यात भरती, देशात चर्चा असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement