काँग्रेस पक्षाच्या आमदारावर महिलेचा गंभीर आरोप, म्हणाली, ते माझे पती..., नेत्याच्या घराबाहेर हायहोल्टेज ड्रामा

Last Updated:

एका महिलेने केलेल्या आरोपाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार मामन खान
आमदार मामन खान
धर्मबीर सिंह, प्रतिनिधी
गुरुग्राम, 24 ऑगस्ट : हरियाणा राज्यातील नूंह हिंसाप्रकरणी चर्चेत आलेले फिरोजपुर झिरका येथील काँग्रेस पक्षाचे आमदार मामन खान यांचे नाव आता आणखी एक विवादात सापडले आहे. आधी आमदार मामन खान यांचे नाव नूंह हिंसा प्रकरणी समोर आले होते. यानंतर सरकारने त्यांना एक मोठा झटका दिला आणि 5 ऑगस्टला सरकारने काँग्रेस आमदार मामन खान यांची पोलीस सुरक्षा काढून घेतली. यानंतर असे वाटत होते ही सारे काही शांत झाले आहे. असे असतानाच आता आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
advertisement
एका महिलेने केलेल्या आरोपाने हरियाणाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर गुरुग्राममध्ये काँग्रेसचे आमदार मामन खान यांच्या घराबाहेर अनेक तास चांगलाच हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महिलेचे वय 25 वर्षे आहे. ही महिला हिसार येथील रहिवासी आहे. या महिलेने आमदार मामन खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. फिरोजपुर झिरकाचे काँग्रेसचे आमदार मामन खान हे तिचे पती असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच माझी माझ्या पतीसोबत भेट घालून देण्यात यावे, अशी विनंतीही तिने पोलिसांना केली आहे.
advertisement
ही महिला सर्वप्रथम काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानी मालिबू टाऊनमध्ये पोहोचली होती. याठिकाणी तिने आमदाराला भेटण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच गदारोळानंतर तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर पोलीस जिप्सी निवासस्थानी पोहोचली आणि तब्बल एक तासाच्या हायप्रोफाईल ड्रामानंतर पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात नेले. यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला बोलावण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस महिलेची चौकशी करत आहेत.
advertisement
आमदार मामन खान काय म्हणाले -
याबाबत आमदार मामन खान यांनी महिलेचे आरोप फेटाळले आहेत. या आरोपांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आमदार यांच्या पत्नी यांनी या महिलेविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. काँग्रेसचे आमदार मामन खान यांनी न्यूज18 सोबत संवाद साधला आणि हा षडयंत्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, माझ्या राजकारणाला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजपर्यंत त्यांनी त्या महिलेला पाहिलेही नाही आणि ते तिला ओळखतही नाही. त्या महिलेला माझ्या घराचा पत्ता कोणी दिला, ती हे सर्व का करत आहे, मला काहीच माहिती नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/देश/
काँग्रेस पक्षाच्या आमदारावर महिलेचा गंभीर आरोप, म्हणाली, ते माझे पती..., नेत्याच्या घराबाहेर हायहोल्टेज ड्रामा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement