गोवा ट्रिपमध्ये ताबा सुटला, प्रायव्हेट Photo नी मोबाईल भरला, परत येताच महिलेने बॉसला रंग दाखवला!

Last Updated:

ऑफिसमध्ये झालेली मैत्री, त्यानंतर वाढलेल्या जवळीकीमुळे व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.

गोवा ट्रिपमध्ये ताबा सुटला, प्रायव्हेट Photo नी मोबाईल भरला, परत येताच महिलेने बॉसला रंग दाखवला!
गोवा ट्रिपमध्ये ताबा सुटला, प्रायव्हेट Photo नी मोबाईल भरला, परत येताच महिलेने बॉसला रंग दाखवला!
ऑफिसमध्ये झालेली मैत्री, त्यानंतर वाढलेल्या जवळीकीमुळे व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पीडित पुरुष 2014 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता आणि ऑगस्ट 2024 मध्ये त्याने लग्न केले. 3 वर्षांपूर्वी त्याने अंकिता नावाच्या महिलेला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी दिली. सुरुवातीला दोघांमध्येही व्यावसायिक संबध होते, पण वैवाहिक आयुष्यात त्याला नैराश्य आलं होतं, तेव्हा अंकिताने त्याला रेकी थेरपीने बरं करण्याची ऑफर दिली.
रेकी थेरपीने उपचार करण्यासाठी अंकिताने त्याच्याकडे 1 लाख रुपये मागितले, जे तक्रारदाराने दिले. यानंतर अंकिताने त्याला गोव्याला जायची ऑफर दिली. नैसर्गिक वातावरणामुळे बरं व्हायला मदत होईल, असं अंकिताने त्याला सांगितलं.
गोव्यामध्ये अंकिताने त्याच्यासोबतची जवळीक वाढवली आणि तिने मोबाईलवर प्रायव्हेट फोटो काढले. हेच फोटो दाखवून अंकिताने त्याला धमकवायला सुरूवात केली. कामाचा करार संपल्यानंतर अंकिताने ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. मी ज्या चित्रपट प्रकल्पात गुंतवणूक करत आहे, त्यात गुंतवणूक केली नाही, तर हे फोटो तुझ्या पत्नीला दाखवेन, अशी धमकी अंकिताने त्याला दिली.
advertisement
गोव्यामधले प्रायव्हेट फोटो उघड होतील, या भीतीने त्याने फर्मच्या मालकाकडून 12.5 लाख रुपयांची व्यवस्था केली, पण तरीही अंकिताच्या मागण्या थांबल्या नाहीत. दबावाखाली तक्रारदाराने अंकिताला आणखी 3 लाख रुपये दिले. यानंतर अंकिताने थेट तक्रारदाराच्या पत्नीशी संपर्क साधला आणि तिला गोव्यातले फोटो आणि व्हिडिओ दाखवले. तसंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादात मदत करण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे घेऊनही अंकिताने तक्रारदाराच्या जवळच्या व्यक्तींना हे फोटो आणि व्हिडिओ दाखवले.
advertisement
वारंवारच्या धमक्यांनी त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर अहमदाबाद पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी अंकिता आणि तिच्या सहकाऱ्याविरुद्ध फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या ट्रॅपमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
गोवा ट्रिपमध्ये ताबा सुटला, प्रायव्हेट Photo नी मोबाईल भरला, परत येताच महिलेने बॉसला रंग दाखवला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement