कोट्यातून रेल्वे तिकीट 'कन्फर्म' करताय? तर तुम्हाला येणार फोन अन् तिकीट होणार कॅन्सल; कारवाई होणार ती वेगळी!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
गोरखपूर येथील रेल्वे HO कोट्यात मोठा घोटाळा उघड झाला असून, बनावट लेटरहेड व दलालांच्या मदतीने व्हीआयपी कोट्यातून तिकीट मिळवले जात होते. एका PNR वर पाच तिकीटं मिळवली गेली होती आणि...
भारतीय रेल्वेने आता तिकीट बुकिंगमधील फसवणूक आणि दलाली रोखण्यासाठी कंबर कसली आहे. नुकत्याच समोर आलेल्या दोन मोठ्या प्रकरणांमुळे रेल्वेने आपली कोटा प्रणाली पारदर्शक करण्याचा आणि मध्यस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक प्रकरण बनावट लेटरहेड वापरून तिकीट बुक करण्याशी संबंधित आहे, तर दुसरे गोरखपूरमधील रेल्वे हेड ऑफिस (HO) कोट्यातून बुक केलेल्या तिकिटांमधील मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघड करणारे आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या ट्रेनचे तिकीट कन्फर्म करण्यासाठी कोटा मिळत असेल, तर आता सावध राहा.
प्रवाशांना फोन करणार रेल्वे प्रशासन
गोरखपूरमधील HO कोट्यातून बुक केलेल्या तिकिटांची तपासणी करण्यासाठी रेल्वे आता अचानक फोन करून चौकशी करत आहे. या प्रक्रियेनुसार, रेल्वे कर्मचारी तिकीट कन्फर्म करण्यापूर्वी प्रवाशांना फोन करतील. चौकशीत काही संशयास्पद उत्तर मिळाल्यास, तिकीट लगेच रद्द केले जाईल. यासोबतच, कोटा पाठवणाऱ्या व्यक्तीचीही कसून चौकशी केली जाईल. दलालांना ओळखणे आणि कोट्याचा गैरवापर थांबवणे या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे. प्रवाशांशी थेट संवाद साधल्यास दलाली रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे रेल्वेचे मत आहे.
advertisement
रेल्वेमध्ये तिकीट कन्फर्मेशनची नवी प्रणाली सुरू
रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की, ही नवीन प्रणाली दिल्ली आणि मुंबईला जाणाऱ्या प्रमुख गाड्यांमध्ये सुरू केली जात आहे. HO कोट्यातून जागा वाटप केलेल्या प्रवाशांचा डेटा सिस्टिममध्ये फीड करण्यापूर्वी, रेल्वे कर्मचारी तिकीट प्रक्रियेसंबंधी माहिती देखील घेतील. कोटा योग्य आणि पारदर्शकपणे वाटप केला जात आहे याची खात्री करण्यासाठी हे पाऊल आहे.
advertisement
एजंटकडून झाली फसवणूक
दादर एक्स्प्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या फसवणुकीने या समस्येची गांभीर्यता अधोरेखित केली आहे. 6 जून रोजी, गोरखपूरहून LTT ला जाणाऱ्या दादर एक्स्प्रेसमध्ये एकाच PNR वरून HO कोट्यातून पाच तिकिटे कन्फर्म करण्यात आली होती. ही तिकिटे रेल्वे राज्यमंत्र्यांच्या P-2 च्या नावाने फॅक्सद्वारे पाठवली गेली होती. TTE ने त्यांना फॉर्म भरण्यास सांगितले आणि चौकशी केली तेव्हा प्रवाशांनी सांगितले की, एका एजंटने त्यांना प्रति व्यक्ती 5500 रुपये दराने तिकिटे मिळवून दिली होती. हे स्पष्टपणे दर्शवते की दलाल कसे VIP कोट्याचा गैरवापर करत होते आणि प्रवाशांकडून मोठी रक्कम आकारत होते. रेल्वेची दक्षता पथक या दोन्ही प्रकरणांची गंभीरपणे चौकशी करत आहे. या खुलासानंतर, रेल्वे आता कोटा प्रणाली पूर्णपणे पारदर्शक करण्याच्या आणि दलाली समूळ नष्ट करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
advertisement
हे ही वाचा : AI आणि Google पेक्षाही 'हे' पक्षी आहेत हुशार; अचूक सांगतात पावसाचा अंदाज! कसे ओळखाल त्यांचे संकेत?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 18, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
कोट्यातून रेल्वे तिकीट 'कन्फर्म' करताय? तर तुम्हाला येणार फोन अन् तिकीट होणार कॅन्सल; कारवाई होणार ती वेगळी!