advertisement

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन

Last Updated:

अध्यक्ष मैक्रॉ यांच्या मुंबई भेटीत भारत-फ्रान्स संबंध, नवोन्मेष, व्यापार, संरक्षण, सांस्कृतिक सहकार्य आणि AI, हेलिकॉप्टर, संग्रहालय उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली.

News18
News18
माझे  प्रिय मित्र, अध्यक्ष  मैक्रॉ यांचे मुंबईत स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या वर्षी त्यांनी मला फ्रान्समध्ये  आयोजित एआय ऍक्शन समिट साठी निमंत्रित केले होते.
त्यावेळी आम्ही मार्सेय येथे भेट दिली, जे फ्रान्सचे सर्वात मोठे बंदर आहे आणि संपूर्ण युरोपचे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. मार्सेय हे ते शहर आहे जिथून पहिल्या जागतिक युद्धात आपल्या भारतीय सैनिकांनी युरोपमध्ये पाऊल टाकले. त्यांच्या शौर्यगाथांची  युरोपच्या अनेक भागांमध्ये आजही आठवण काढली जाते.
आणि हे ते शहर आहे, जिथे स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी समुद्रात उडी मारली होती. त्यांचे ते साहस भारताच्या स्वातंत्र्याप्रति त्यांच्या अतूट संकल्पाचे प्रतीक होते. मला गेल्या वर्षी  मार्सेय येथे त्यांचे स्मरण करण्याचे आणि त्यांना वंदन करण्याचे भाग्य लाभले होते.
advertisement
यावेळी जेव्हा अध्यक्ष मैक्रॉ भारतात एआय इम्पॅक्ट समिट साठी आले आहेत , तेव्हा आपले सौभाग्य आहे की आपण त्यांचे स्वागत, भारताचे प्रवेशद्वार म्हणजेच मुंबईत करत आहोत.
भारत आणि फ्रान्स दरम्यानचे संबंध अतिशय खास आहेत. फ्रान्स भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. आणि अध्यक्ष  मैक्रॉ यांच्याबरोबर आपण या धोरणात्मक भागीदारीला अभूतपूर्व  ऊर्जा दिली आहे. याच विश्वास आणि सामायिक दृष्टिकोनाच्या आधारे आज आम्ही आपले संबंध विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी म्हणून  स्थापित करत आहोत.
advertisement
आज भारतात हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे उद्घाटन हे त्याच दृढ विश्वासाचे आणखी एक उज्ज्वल उदाहरण आहे. आम्हाला अभिमान आहे की भारत आणि फ्रान्स एकत्र येऊन माऊंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे जगातील एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार करणार आहेत, आणि ते संपूर्ण जगात निर्यातही केले जाणार आहे. म्हणजेच, भारत–फ्रान्स भागीदारीला कोणत्याही सीमा नाहीत; तिची व्याप्ती अथांग महासागरांपासून ते सर्वात उंच पर्वतशिखरांपर्यंत आहे.
advertisement
वर्ष 2026 हे भारत आणि युरोप यांच्यातील संबंधांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. काही दिवसांपूर्वीच आपण युरोपियन युनियनसोबत भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करार केला आहे. हा मुक्त व्यापार करार भारत–फ्रान्स संबंधांनाही अभूतपूर्व गती देणारा ठरेल.
परस्पर गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आज आम्ही एक करार करत असून त्यामुळे आमच्या लोकांना आणि कंपन्यांना दुहेरी कर द्यावा लागणार नाही. या सर्व उपायांमुळे परस्पर व्यापार, गुंतवणूक आणि गतिशीलतेला नवी ऊर्जा मिळेल आणि हाच सामायिक समृद्धीचा मार्ग आहे.
advertisement
भारत-फ्रांस यांच्यातील नवोन्मेष वर्षाच्या शुभारंभासह, आज आम्ही आपल्यातील धोरणात्मक भागीदारीला लोकांच्या भागीदारीचे स्वरूप देत आहोत. कारण नवोन्मेष हा एकट्यापुरता मर्यादित नसतो तर तो सहयोगाने सार्थ होतो.
यासाठीच भारत-फ्रांस  नवोन्मेष वर्ष उपक्रमातून लोकांमधील संबंध अधिक मजबूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. संरक्षण असो किंवा स्वच्छ ऊर्जा, अंतराळ असो किंवा उदयोन्मुख तंत्रज्ञान, प्रत्येक क्षेत्रात आम्ही आमच्या उद्योगांना आणि नवोन्मेषकर्मींना जोडणार आहोत.
advertisement
स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांदरम्यान आम्ही मजबूत संपर्क स्थापन करणार आहोत. आमचे विद्यार्थी आणि संशोधक यांचे आदानप्रदान आता अधिक सुलभ होईल. आणि यासोबतच संयुक्त नवोन्मेषासाठी नवीन केंद्रांची निर्मिती देखील केली जाईल.
आज आम्ही महत्त्वपूर्ण खनिजे, जैवतंत्रज्ञान, प्रगत धातू या क्षेत्रातील आमचे सहकार्य अधिक दृढ करत आहोत. आम्ही आरोग्यासाठी इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय, डिजिटल विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी इंडो-फ्रेंच सेंटर आणि एरोनॉटिक्समधील कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र  सुरू करणार आहोत. आणि या केवळ संस्था नव्हेत तर भविष्य निर्मितीचे व्यासपीठ आहे.
advertisement
आज जग अनिश्चिततेच्या युगातून जात आहे. अशा परिस्थितीत, भारत-फ्रांस भागीदारी जागतिक स्थैर्यासाठी एक शक्ती म्हणून कार्य करत आहे. आम्ही फ्रांस मधील तज्ञ आणि भारताकडील व्यापकतेची सांगड घालत आहोत. आम्ही विश्वासार्ह तंत्रज्ञान विकसित करत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर  आणि संयुक्त विकास प्रकल्पांद्वारे मानवी विकास सुनिश्चित करु आणि संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून बहुपक्षीयता स्थिरता आणि समृद्धीच्या प्रयत्नांना चालना देत राहू.
भारत आणि फ्रान्स ,दोघांचाही , कायद्याचे राज्य आणि बहुध्रुवीय जगावर विश्वास आहे. जागतिक संस्थांमधील सुधारणांद्वारेच जागतिक आव्हानांवर तोडगा निघू शकेल याबाबत आमचे एकमत आहे. यूक्रेन, पश्चिम आशिया असो किंवा हिंद-प्रशांत क्षेत्र , आम्ही प्रत्येक प्रांतात शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांचे समर्थन करत राहू.  दहशतवादाचे प्रत्येक रूप आणि  स्वरूप मुळापासून नष्ट करणे ही आमची सामायिक वचनबद्धता आहे.
भारत आणि फ्रान्स , दोघांचीही प्राचीन आणि  समृद्ध संस्कृती आहे. आम्ही आमच्या सांस्कृतिक आणि जनतेमधील संबंधांना अधिक महत्व देतो.  मला आनंद आहे की युगे युगीन भारत संग्रहालयासाठी आमचे सहकार्य  राहिले आहे. आणि आता लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलासाठीही आम्ही फ्रान्सबरोबर सहकार्य करणार आहोत. भारतीय संस्कृती फ्रान्सच्या लोकांपर्यंत अधिक निकट पोहोचावी यासाठी आम्ही लवकरच  फ्रान्स   मध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहोत.
भारत–फ्रान्स भागीदारीच्या प्रति आमची दृढ वचनबद्धता सदैव राहिली आहे. आज आपण एकत्र येऊन आपल्या संबंधांचा एक नवीन अध्याय सुरु करत आहोत याचा मला विशेष आनंद होत आहे. चला, जागतिक स्थिरता आणि समृद्धीसाठी आपण एकत्र काम करूया.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement