AI कॅमेरे रेल्वे इंजिनमध्ये बसणार अन् अपघातांचं प्रमाण कमी होणार, पटरीवर येणाऱ्या वस्तूची माहिती चालकाला मिळणार

Last Updated:

भारतीय रेल्वेने अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 14 हजार इंजिनमध्ये AI आधारित कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे लेसर तंत्रज्ञानासह राहणार असून ट्रॅकवरील संशयास्पद वस्तू लगेच ओळखून लोको पायलटला संदेश देतील. या योजनेमुळे रेल्वे सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

News18
News18
रेल्वे पटरीवर ठेवलेल्या अडथळ्यांची किंवा संशयास्पद वस्तूंची ओळख करण्यासाठी लोको पायलटला प्रत्यक्ष पाहता आलं नाही तरी, आता ट्रेनच्या AI डोळ्यांनी हे निश्चितपणे ओळखता येईल. तसेच, लगेचच लोको पायलटला संदेशाद्वारे सूचना मिळेल. भारतीय रेल्वेने Rods, Cylinders किंवा इतर अडथळ्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी इंजिनमध्ये AI आधारित कॅमेरे लावले जाणार आहेत. संबंधित मंत्रालयाच्या नुसार, या दिशेने काम लवकरच सुरू होणार आहे.
14 हजार इंजिनमध्ये बसणार AI कॅमेरे : मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅक व ट्रेनच्या सुरक्षेसाठी 14000 इंजिनमध्ये AI आधारित कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कॅमेरे फक्त साधे कॅमेरे नसून, त्यात लेसर तंत्रज्ञानाची जोड असेल. रेल्वे ट्रॅकवर काही संशयास्पद गोष्ट आढळल्यास, लेसर लाईट त्यावरून परत येईल आणि कॅमेऱ्याला संदेश मिळेल. हे कॅमेरे AI तंत्रज्ञानावर आधारित असल्याने लगेचच लोको पायलटला सूचना मिळेल, ज्यामुळे तो आवश्यक ती पावले उचलू शकेल. मंत्रालयानुसार, हे काम लवकरच सुरू होणार असून, वर्षभरात पूर्ण करण्याची योजना आहे.
advertisement
प्रत्येक इंजिनमध्ये चार AI कॅमेरे बसणार :  प्रत्येक इंजिनमध्ये 4 कॅमेरे बसवले जातील. यातील 2 कॅमेरे पुढच्या बाजूस आणि दोन कॅमेरे मागच्या बाजूस बसवले जातील. यामुळे दोन्ही बाजूंचे निरीक्षण होऊ शकते. AI कॅमेरा लेसर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लांबवर ठेवलेल्या अडथळ्यांचे किंवा संशयास्पद वस्तूंचे निरीक्षण करेल आणि ओळखेल. अडथळा नेमका कसा आहे, जसे तो प्राणी आहे का, माणूस आहे का, किंवा काही स्फोटक आहे का, हे कॅमेरा लगेच कळवेल. हे कॅमेरे ठराविक अंतरावरून संशयास्पद वस्तू ओळखू शकतात, ज्यामुळे लोको पायलट वेळेवर आपत्कालीन ब्रेक लावू शकेल.
advertisement
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, AI कॅमेरे आणि आपत्कालीन ब्रेक यांना जोडण्यासाठी देखील संशोधन सुरू आहे. यामुळे अशा परिस्थितीत आपत्कालीन ब्रेक आपोआप लागू होतील आणि ट्रेन थांबवता येईल. यामुळे अपघात होण्याची शक्यता जवळपास शून्यावर जाईल.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
AI कॅमेरे रेल्वे इंजिनमध्ये बसणार अन् अपघातांचं प्रमाण कमी होणार, पटरीवर येणाऱ्या वस्तूची माहिती चालकाला मिळणार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement