advertisement

स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 ला 10,000 कोटी निधी मंजूर, भारतातील स्टार्टअप्सना दीर्घकालीन भांडवल व नवोन्मेषाला प्रोत्साहन.

News18
News18
भारताच्या वाढत्या स्टार्टअप परिसंस्थेला मोठा बळकटी देणाऱ्या निर्णयात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 (स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी एकूण 10,000 कोटी रुपये निधी निश्चित करण्यात आला असून देशातील स्टार्टअप परिसंस्थेसाठी व्हेंचर कॅपिटल उभारणी हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
ही योजना भारताच्या स्टार्टअप प्रवासाच्या पुढील टप्प्यास गती देण्यासाठी राबविण्यात येणार असून दीर्घकालीन देशांतर्गत भांडवल उभारणी, व्हेंचर कॅपिटल परिसंस्थेचे बळकटीकरण आणि नवोन्मेषाधारित उद्योजकतेला देशभर प्रोत्साहन देणे हे तिचे उद्दिष्ट आहे.
2016 मध्ये सुरू झालेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 मुळे गेल्या जवळपास दहा वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांना पुढील गती मिळणार आहे. 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया सुरू झाल्यापासून भारतातील स्टार्टअप परिसंस्थेत अभूतपूर्व परिवर्तन झाले असून 500 पेक्षा कमी स्टार्टअप्सपासून वाढ होऊन आज उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) मान्यताप्राप्त 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. 2025 हे वर्ष सर्वाधिक वार्षिक स्टार्टअप नोंदणीचे वर्ष ठरले आहे.
advertisement
फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप्स 1.0 वर आधारित पुढील टप्पा
स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप्स (एफएफएस 1.0) च्या यशस्वी अंमलबजावणीवर आधारित आहे. एफएफएस 1.0 अंतर्गत देशांतर्गत व्हेंचर कॅपिटल बाजारपेठेतील निधीअभाव दूर करण्यासाठी आणि स्टार्टअप्सना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली.
advertisement
एफएफएस 1.0 अंतर्गत एकूण 10,000 कोटी रुपये निधी 145 पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ) यांना देण्यात आला. या एआयएफद्वारे देशभरातील 1,370 हून अधिक स्टार्टअप्समध्ये 25,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली असून त्यात शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, वाहन उद्योग, स्वच्छ तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू व सेवा, ई-कॉमर्स, शिक्षण, फिनटेक, अन्न व पेये, आरोग्यसेवा, उत्पादन, अवकाश तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
advertisement
एफएफएस 1.0 मुळे प्रथमच उद्योजक बनणाऱ्या संस्थापकांना प्रोत्साहन, खासगी भांडवलाची गुंतवणूक आकर्षित करणे आणि भारतातील व्हेंचर कॅपिटल परिसंस्थेचा मजबूत पाया घडविणे शक्य झाले.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :
पहिल्या टप्प्याने परिसंस्था उभारली, तर स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 भारतीय नवोन्मेषाला पुढील पातळीवर नेण्यासाठी रचना करण्यात आली आहे. या नव्या निधीतून खालील बाबींना लक्ष केंद्रीत पाठबळ दिले जाईल :
advertisement
डीप टेक व तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषी उत्पादन -दीर्घकालीन व संयमी भांडवल आवश्यक असलेल्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांतील संशोधन व नवकल्पनांना प्राधान्य.
प्रारंभिक-विकास टप्प्यातील उद्योजकांना बळकटी – नव्या व नाविन्यपूर्ण कल्पनांना आर्थिक सुरक्षा देऊन निधीअभावामुळे होणारे अपयश कमी करणे.
राष्ट्रीय स्तरावरील विस्तार – महानगरांपलीकडे गुंतवणूक वाढवून देशाच्या प्रत्येक भागात नवोन्मेषाला चालना देणे.
उच्च-जोखमीच्या भांडवली तुटी भरून काढणे – आत्मनिर्भरता व आर्थिक वाढीस महत्त्वाच्या क्षेत्रांकडे अधिक भांडवल वळविणे.
advertisement
देशांतर्गत व्हेंचर कॅपिटल आधार बळकट करणे – विशेषतः लहान निधींना पाठबळ देऊन गुंतवणूक परिसंस्थेचा विस्तार.
स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 भारताच्या आर्थिक वाटचालीला दिशा देणारा ठरेल आणि दीर्घकालीन परिवर्तनकारी परिणाम घडवेल अशी अपेक्षा आहे.
जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान, उत्पादने व उपाय विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सना पाठबळ देऊन ही योजना भारताची आर्थिक क्षमता, उत्पादनक्षमता, गुणवत्तापूर्ण रोजगारनिर्मिती आणि जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून भारताची ओळख मजबूत करेल.
advertisement
‘विकसित भारत  2047’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असलेला हा निधी उद्योजकांना सक्षम करण्यासाठी, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची संपूर्ण क्षमता उलगडण्यासाठी सरकारची दृढ वचनबद्धता दर्शवितो.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ला मंत्रिमंडळाची मंजुरी
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement