लहानपणी ज्याच्या लग्नाला गेली त्याच व्यक्तीशी झालं लग्न, सेफ-करीना सारखी आहे तरुणीची कहाणी
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
रेनाटा फादिया असं या महिलेचं नाव आहे. इंडोनेशियातल्या बांगका बेटावर राहणाऱ्या 24 वर्षांच्या फादियाचं 2020मध्ये लग्न झालं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर याचं लग्न त्यांच्या वयातल्या फरकामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. त्यांच्या लग्नाच्या वेळी सैफच्या पहिल्या लग्नातला एक फोटोही व्हायरल झाला होता. करीना सैफच्या पहिल्या लग्नात उपस्थित असल्याचा तो फोटो होता. असाच काहीसा प्रकार इंडोनेशियातल्या एका महिलेच्या बाबतीत घडला आहे. ही महिला लहानपणी ज्या व्यक्तीच्या लग्नात गेली होती आता त्याच व्यक्तीशी तिचं लग्न झालं आहे.
रेनाटा फादिया असं या महिलेचं नाव आहे. इंडोनेशियातल्या बांगका बेटावर राहणाऱ्या 24 वर्षांच्या फादियाचं 2020मध्ये लग्न झालं आहे. लग्नानंतर ती आपल्या पतीच्या घरातले जुने फोटो अल्बम बघत होती. तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण, त्या अल्बममध्ये तिच्या लहानपणीचा फोटो होतो. त्यावरून तिला समजलं, की बालपणी ती तिच्या नवऱ्याच्या लग्नात गेली होती. त्या वेळी फादिया फक्त 9 वर्षांची होती.
advertisement
फादियाचा नवरा तिच्यापेक्षा 38 वर्षांनी मोठा आहे. त्याचं हे तिसरं लग्न आहे. दोघांची पहिली भेट 15 वर्षांपूर्वीच झाली होती, ही बाब त्यांना एकमेकांशी लग्न केलं तरी आठवत नव्हती. 2009 नंतर दोघेही 2019मध्ये ते पुन्हा भेटले आणि 2020मध्ये त्यांनी लग्न केलं. सध्या तिचा नवरा 62 वर्षांचा आहे, तर ती फक्त 24 वर्षांची आहे. दोघांना एक मूलही आहे.
advertisement
इंडोनेशियामध्ये मुलींचं लग्न लवकर केलं जातं. तिथे 2019मध्ये लग्नासाठी वय निश्चित करण्यात आलं आहे. तिथल्या कायद्यानुसार लग्नासाठी मुलींचं किमान वय 16 वर्षं असलं पाहिजे. तिथे वयाच्या किमान 12व्या वर्षापर्यंत शिक्षण घेणं बंधनकारक आहे. 20218मधल्या नोंदीनुसार तिथला साक्षरता दर 96 टक्के आहे. असं असूनही इंडोनेशियामध्येदेखील पालक आपल्या मुलींचे बालविवाह करत आहेत.
advertisement

सोर्स : सोशल मीडिया
पूर्वी भारतामध्येदेखील अशीच परिस्थिती होती. भारतात बालविवाहाचं प्रमाण जास्त होतं. अनेक मुलींचं कमी वयातच लग्न लावून दिलं जात होतं; मात्र आता कायदे आणि नियम अधिक कडक केल्याने यात घट झाली आहे. तरीदेखील दुर्गम आणि मागास भागात बालविवाहाची प्रकरणं घडतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2024 9:42 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
लहानपणी ज्याच्या लग्नाला गेली त्याच व्यक्तीशी झालं लग्न, सेफ-करीना सारखी आहे तरुणीची कहाणी


