घराच्या गार्डनमध्ये लावा 4 झाडे! कडाक्याचा थंडीतही मिळतील फळे
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Home Garden Tips : हिवाळ्याचे दिवस सुरू होताच अनेकांना घरातील झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड वातावरण, कमी सूर्यप्रकाश आणि कोरडी हवा यामुळे अनेक वनस्पतींची वाढ मंदावते.
हिवाळ्याचे दिवस सुरू होताच अनेकांना घरातील झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड वातावरण, कमी सूर्यप्रकाश आणि कोरडी हवा यामुळे अनेक वनस्पतींची वाढ मंदावते. त्यामुळे बहुतांश लोकांना वाटते की या ऋतूत घरात फळ देणारी झाडे लावणे कठीण आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. काही अशी फळझाडे आहेत जी अगदी कमी सूर्यप्रकाशात, थंड वातावरणात आणि कुंड्यांमध्येही सहज वाढतात.
advertisement
जर तुमच्या घरात खिडकीजवळ जागा, बाल्कनी किंवा हलका सूर्यप्रकाश मिळणारी खोली असेल, तर तुम्ही हिवाळ्यातही घरात फळझाडे वाढवू शकता. ही झाडे केवळ घराला हिरवेपण देत नाहीत, तर घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे, या झाडांवर येणाऱ्या फळांचा आनंद तुम्ही थेट घरूनच घेऊ शकता. त्यामुळे हिवाळ्यात घरातील बागकामाचा छंद जोपासण्यासाठी हा उत्तम काळ मानला जातो.
advertisement
<strong>लिंबू -</strong> हे घरात लावण्यासाठी सर्वांत सोपे आणि उपयुक्त फळझाड आहे. लिंबाचे झाड वर्षभर फळ देते आणि हिवाळ्यातही ते चांगले वाढते. त्याच्या पानांमधून येणारा ताजातवाना सुगंध घरातील वातावरण प्रसन्न करतो. हे झाड खिडकीजवळ ठेवल्यास, हलके पाणी दिल्यास आणि माती फार ओलसर राहणार नाही याची काळजी घेतल्यास उत्तम वाढते.
advertisement
<strong>संत्री - </strong> संत्र्याचे झाड देखील घरात वाढवण्यासाठी चांगला पर्याय आहे. त्याची चमकदार हिरवी पाने थंडीतही ताजी राहतात. थोडासा सूर्यप्रकाश आणि नियमित, मर्यादित पाणी दिल्यास हे झाड कुंडीत छान वाढते. हिवाळ्यात घराच्या कोपऱ्यात किंवा बाल्कनीत ठेवलेले संत्र्याचे रोप घराच्या सौंदर्यात भर घालते.
advertisement
advertisement









