Success Story : शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केला व्यवसाय, महिन्याला 3 लाख उलाढाल, शेतकऱ्यानं असं काय केलं?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Farmer Success Story: शेतकरी शेतामध्ये सध्या नवनवीन व्यवसाय सुरू करत आहेत. कैलास उदावंत या शेतकऱ्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
हा व्यवसाय 3 वर्षांपूर्वी सुरू असून सुरुवातीच्या वेळी त्यांच्याकडे केवळ 50 पक्षी होते नंतर 1 हजार पक्षी झाले आणि आज रोजी उदावंत यांच्याकडे 2 हजार कोंबड्या आहेत. यातून दररोज एक हजार अंडी निघतात. दर महिन्याला 3 लाख रुपयांपर्यंत या कोंबडी पालनाच्या माध्यमातून उलाढाल होते आणि सर्व खर्च वजा दीड लाख रुपये नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
कोंबडी पालन व्यवसायातून दीड लाख रुपये महिन्याकाठी निव्वळ नफा मिळतो. हा आकडा उत्पन्न दर्शवत नाही तर ग्रामीण भागात शेतीसोबत जोडधंदा किती फायदेशीर ठरू शकतो हे सिद्ध करतात.त्यामुळे उदावंत यांनी शेतकऱ्यांना या व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले आहे. योग्य नियोजन आणि समस्या सोडवण्याची वृत्ती असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो असे या उदाहरणावरून समजते.










