advertisement

Farmer Success Story: शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!

Last Updated:
शेतकरी मोहन भोसले यांनी तीन एकरात सोलापूर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबाला बाजारात चांगलीच मागणी असल्यामुळे 5 ते 6 लाखांचे उत्पन्न शेतकरी मोहन भोसले यांना मिळणार आहे.
1/7
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी मोहन भोसले यांनी तीन एकरात सोलापूर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. तीन एकरात डाळिंब लागवडीला खर्च 3 लाख रुपयांपर्यंत आला आहे. सध्या डाळिंबाला बाजारात चांगलीच मागणी असल्यामुळे 5 ते 6 लाखांचे उत्पन्न शेतकरी मोहन भोसले यांना मिळणार आहे.

2/7
पापरी गावातील शेतकरी मोहन दत्तात्रय भोसले यांनी तीन एकरात सोलापूर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. तीन एकरात मोहन यांनी 12 सोलापूर भगवा या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. तीन एकरामध्ये सोलापूर भगवा डाळिंब लागवडीसाठी रोप, फवारणी, खत, आदी मिळून 3 लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे.

3/7
सोलापूर भगवा जातीच्या डाळिंबावर कुजवा आणि डाग हे दोन रोग पडतात. रोपांवर योग्य त्या औषधांची फवारणी करून या दोन्ही रोगांपासून बचाव केले जाते.

4/7
उन्हाळ्यात तीन एकरामध्ये डाळिंब खराब होऊ नये यासाठी मोहन भोसले यांनी डाळिंबाच्या बागेवर शेडनेट मारले होते. सोलापूर भगवा डाळिंब लागवडीतून अधिक माल निघतो.

5/7
आकाराने जरी हा डाळिंब लहान असला तरी या सोलापूर भगवा डाळिंबाचे उत्पादन जास्त असतं. मोहन यांनी सोलापूर भगवा डाळिंबाची पहिल्यांदाच लागवड केली असून दहा टनपेक्षा अधिक डाळिंब उत्पादन मिळणार आहे. तर या डाळिंबाच्या विक्रीतून त्यांना 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

6/7
सोलापूर जिल्ह्यातील पापरी गावातील शेतकरी मोहन भोसले यांच्या डाळिंबाला खरेदी करण्यासाठी व्यापारी शेतात भेट देत आहेत. सरासरी 50 ते 60 रुपये किलो दराने या डाळिंबाला व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.

7/7
परंतु भोसले यांनी हा डाळिंब 80 ते 90 रुपये किलो दराने विक्री करायचा आहे. शिक्षण शिकूनही नोकरी जर मिळत नसेल तर तरुणांनी नक्कीच शेतीकडे वळावे. नोकरीपेक्षाही जास्त उत्पन्न मिळेल, असा सल्ला शेतकरी मोहन भोसले यांनी दिला आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement