उसात घेतलं बटाट्याचं आंतरपीक, शेतकऱ्याला 3 लाख रुपयांचा नफा, कशी केली यशस्वी शेती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
बीड जिल्ह्यातील कुप्पा गावातील तरुण शेतकरी नितीन पवार यांनी आधुनिक शेतीतून मोठा नफा मिळवला आहे. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी आपल्या शेतीकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नितीन यांनी बटाट्याची लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. योग्य बियाण्यांची निवड, ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खते वापरल्याने उत्पादनाची गुणवत्ता सुधारली आहे. एका एकरात घेतलेल्या बटाट्याच्या पिकातून त्यांना सरासरी 100 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. बाजारभाव चांगला मिळाल्यास ते एका हंगामातच कमीत कमी 3 लाख रुपयांचा नफा कमावतात. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा हा फॉर्म्युला आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
नितीन पवार पारंपरिक शेतीच्या मर्यादा ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. बियाणे निवडीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ते विज्ञानाधिष्ठित पद्धती वापरतात. ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांच्या योग्य वापरामुळे उत्पादन वाढले असून कमी पाण्यातही अधिक उत्पन्न मिळत आहे. बाजारातील मागणीचा अभ्यास करून त्यांनी आपल्या उत्पादनाची विक्रीही प्रभावीपणे व्यवस्थापित केली आहे. त्यामुळे कमी वेळेत चांगला नफा मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
advertisement