दुहेरी उत्पन्नाचं साधन भारीच, 6 महिन्यात 3 लाख फायदा, शेतकऱ्यानं असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
नान्नज्या हाजी बशीर अहमद शेख या शेतकऱ्यानं पाण्यासाठी शेततळं बांधलं. त्यातच मत्स्यशेती करून आता ते दुहेरी उत्पन्न घेत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शेख यांना शेततळे तयार करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपयेपर्यंत खर्च आला. यातील 80 हजार रुपयांचं अनुदान देखील त्यांना शासनाकडून मिळालं आहे. याच शेततळ्यात त्यांनी मत्स्यशेतीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी माशांची चिलापी ही जात निवडली आहे. चिलापी जातीच्या माशांना एकावेळी 100 हून अधिक पिल्ले होतात. त्यामुळे उत्पन्न चांगले मिळते, असे शेख सांगतात.
advertisement
चिलापी या माशाला एकदा तळ्यात सोडल्यानंतर त्यापासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. चिलापी माशांना खाण्यासाठी फिश फूड किंवा तांदूळ शेततळ्यामध्ये टाकले जाते. मत्स्यशेतीसाठी पाणी गरजेचं असतं. दररोज घाण झालेलं पाणी काढून शेतीला दिलं जातं. त्याचा शेतीला फायदा होतो. तर पुन्हा शेततळ्यात पाणी सोडलं जातं, असंही शेख यांनी सांगितलं.
advertisement
माशांच्या खरेदीसाठी हैद्राबाद, पुणे, येथील व्यापारी शेततळ्याच्या ठिकाणी येतात. मासे पाहून त्याची तिथेच विक्री केली जाते. चिलापी माशाच वजन 200 ते 700 ग्रॅमपर्यंत असते. त्याची विक्री 60 ते 80 रुपये किलोप्रमाणे होत असते. यातून दीड लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळाला आहे. परंतु, शेतीसोबत हा व्यवसाय दुहेरी उत्पन्नाचे साधन ठरत आहे, असे शेख सांगतात.