मार्चचा शेवट होणार गोड! केतूचं नक्षत्र परिवर्तन 'या' राशींच्या आयुष्यात आणणार सुखाचं वादळ, होणार तगडा फायदा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे छाया ग्रह नेहमी वक्री चालीने चालतात आणि त्यांच्या एका एका बदलाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. मार्च महिन्याच्या शेवटी, म्हणजेच 29 मार्च 2026 रोजी केतू स्वतःच्या मालकीच्या 'मघा' नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
सिंह - आर्थिक समृद्धी आणि मान-सन्मान: सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ 'गोल्डन पिरीयड' ठरणार आहे. केतू तुमच्या राशीतच नक्षत्र बदल करत असल्याने समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित आणि मोठा परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायानिमित्त केलेले परदेश प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमची स्वप्ने पूर्ण होतील.
advertisement
धनु - भाग्याची साथ आणि आध्यात्मिक प्रगती: धनु राशीच्या जातकांना नशिबाची भक्कम साथ मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अतिशय उत्तम आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल. आध्यात्मिक कार्यात तुमची ओढ वाढेल, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक शांती आणि समाधान लाभेल.








