Aajache Rashibhavishya: खूप सोसलं, शुक्रवारी कष्टाचं चीज होणार, या राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी खास असणार आहे. तुमच्या राशीसाठी आरोग्य, संपत्ती, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यवसाय याबाबत दिवस कसा असेल? हे आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी - आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा.
advertisement
कर्क राशी - आपल्या आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
सिंह राशी - तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. अविवाहित मंडळीना आज आनंदाची बातमी मिळू शकते. तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
कन्या राशी -आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. पुढील काही दिवसांत चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल. आज तुमचा शुभ अंक 3 रंग पिवळा असणरा आहे.
advertisement
तूळ राशी - छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आरोग्य एकदम चोख असेल. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. तक्रार करायला वाव ठेऊ नका. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणरा आहे.
advertisement
धनु राशी - तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल - म्हणूनच तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
मकर राशी - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात.आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा अंस्र आहे.
advertisement
कुंभ राशी - तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
मीन राशी - अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल.आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement