Aajache Rashibhavishya: धन लाभ होणार, कामे मार्गी लागतील, तुमच्या राशीचं आजचं राशिभविष्य काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Aajache Rashibhavishya: श्रावणाच्या या पहिल्या सोमवारी भगवान शिवाचे आशीर्वाद सर्वांवर राहतील. काही राशींच्या लोकांना आजच्या दिवसात जबरदस्त लाभ होताना दिसेल. तर रखडलेली कामे काही राशींची आज पूर्ण होतील.
advertisement
वृषभ राशी - आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. आजच्या दिवशी सर्वचजण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हीदेखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
कर्क राशी - तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
सिंह राशी - बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार.
advertisement
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
धनु राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराकडून आज चांगली बातमी मिळणार. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
मकर राशी - धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज केलेले सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या जोडीदाराकडून आज काहीतरी आनंदाची बातमी ऐकून तुमचा दिवस आज आनंदी जाणार आहे. प्रवासाचा योग आज आहे पण प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. प्रेम आशेचा किरण दाखवेल. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
मीन राशी - आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement