Baba Vanga: बाबा वेंगाच्या 3 भविष्यवाण्या! ऑगस्ट संपण्याआधीच उडू शकते खळबळ; कोणत्या राशींवर इफेक्ट?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Latest Predictions Baba Vanga: बाबा वेंगा या बल्गेरियातील एक प्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या. त्यांना 'बाल्कनची नॉस्ट्रॅडॅमस' म्हणूनही ओळखले जाते. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी एका मोठ्या वादळात सापडल्यानं त्यांची दृष्टी गेली. या घटनेनंतर त्यांना भविष्यातील गोष्टी दिसू लागल्याचा दावा त्यांनी केला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, अनेक लोक त्यांच्याकडे भविष्य विचारण्यासाठी येऊ लागले आणि त्यातूनच त्यांची ख्याती जगभरात पसरली.
advertisement
बाबा वेंगा यांनी भारतासाठी थेट कोणतीही भविष्यवाणी केली नसली तरी, त्यांच्या काही जागतिक भविष्यवाण्यांचा संदर्भ भारताशी जोडला जातो. त्यांनी आशियामध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्ती येतील असे म्हटले होते, ज्याचा प्रभाव भारतावरही पडू शकतो. त्यांनी काही ठिकाणी जागतिक संघर्ष आणि राजकीय अस्थिरतेबद्दल भाकीत केले होते, ज्याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येईल.
advertisement
त्यांच्या अनेक भविष्यवाण्या अस्पष्ट आणि प्रतीकात्मक असल्याने, लोक त्यांचा आपापल्या सोयीनुसार अर्थ लावतात. त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या असल्या तरी, बऱ्याचशा भविष्यवाण्या खोट्याही ठरल्या आहेत. मात्र, त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल आजही लोकांमध्ये खूप कुतूहल दिसून येते. खासकरून 2025 या वर्षाबद्दल, त्यांनी भाकीत केले होते की 2025 मध्ये युरोपमध्ये एक मोठा संघर्ष होईल, ज्याचा त्या खंडातील लोकसंख्येवर गंभीर परिणाम होईल.
advertisement
तसेच ऑगस्ट 2025 मध्ये आगी लागण्याच्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला होता. ऑगस्ट 2025 मध्ये आकाश आणि पृथ्वीवरून आग बाहेर येईल, असे त्यांनी म्हटलंय पण, त्याचा नेमका अर्थ अद्याप स्पष्ट झालेला नाही. जंगलातील आगींबद्दल ते भाकित असल्याचे बोलले जात आहे, काहींच्या मते हा संकेत ज्वालामुखीच्या उद्रेकाबद्दल असण्याची शक्यता आहे. आकाशातून उल्कापिंड किंवा लघुग्रह देखील पृथ्वीवर पडू शकतो. काही लोक जगातील अनेक भागांमधील जंगलातील आगीचा संबंध याशी जोडत आहेत.
advertisement
या ऑगस्टसाठी त्यांनी आणखी एक भविष्यवाणी केली होती, ती म्हणजे आत्तापर्यंत जे एक होते ते आता दोन तुकड्यांमध्ये विभागले जाईल आणि दोघेही आपापल्या मार्गाने पुढे जातील. काहींना ही भविष्यवाणी नाटो किंवा युरोपियन युनियनमधील विघटन किंवा मतभेदांचे संकेत असू शकते. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे युरोपच्या पूर्व आणि पश्चिम भागांमधील वाढत्या ताण-तणावाचा संकेत देखील असू शकतो. बाबा वेंगाच्या या भविष्यवाण्या खऱ्या झाल्यास सर्वच राशींवर त्याचा वाईट परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिसून येईल.