Budh Ast: भाग्योदयाचा दिवस 28 फेब्रुवारी! बुधास्ताचे 14 दिवस 5 राशींना सोन्याहून पिवळे; बक्कळ कमाईचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात बुध ग्रह अस्त होणार आहे, ही घटना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जातेय. 28 फेब्रुवारी 2026 ते 13 मार्च 2026 या काळात बुध अस्त स्थितीत असेल. सामान्यतः बुध अस्त झाला की कामात थोडा संथपणा येतो असं मानलं जातं, पण यावेळी मात्र 5 राशींसाठी हा काळ प्रगतीचे आणि धनलाभाचे नवीन मार्ग उघडणारा ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रात बुधाला बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक मानलं जातं. यावेळी बुध कुंभ राशीत असताना अस्त होणार असल्यामुळे काही राशींच्या आर्थिक आणि व्यावसायिक नियोजनाला एक वेगळीच गती मिळणार आहे. प्रसिद्ध ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या माहितीनुसार, या काळात कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आहे ते जाणून घेऊ.
advertisement
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ रखडलेली कामं मार्गी लावणारा असेल. या राशीचा स्वामी स्वतः बुधच असल्यामुळे, त्याचे अस्त होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुमचे काही सरकारी किंवा अधिकृत कामाचे फाईल्स अडकले असतील, तर त्यात आता हालचाल होईल. जे लोक फ्रीलान्स काम करतात किंवा ज्यांचा छोटा व्यवसाय आहे, त्यांना जुन्या ग्राहकांकडून येणे असलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक स्थैर्य जाणवेल. जर तुम्ही कर्जाच्या विळख्यात असाल किंवा पैशांच्या ओढाताणीमुळे त्रस्त असाल, तर तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. खर्चावर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांनी 13 मार्चनंतर निर्णय घेतल्यास ते अधिक फायद्याचं ठरेल. आरोग्याबाबतच्या तक्रारीही या काळात कमी होतील.
advertisement
तूळ राशीसाठी हा काळ कला आणि सर्जनशीलतेला वाव देणारा आहे. जे लोक मीडिया, लेखन किंवा डिझाईनिंग क्षेत्रात आहेत, त्यांना एखादा मोठा आणि नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहील. सामाजिक वर्तुळात तुमचं वजन वाढेल.
advertisement
तूळ राशीसाठी हा काळ कला आणि सर्जनशीलतेला वाव देणारा आहे. जे लोक मीडिया, लेखन किंवा डिझाईनिंग क्षेत्रात आहेत, त्यांना एखादा मोठा आणि नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहील. सामाजिक वर्तुळात तुमचं वजन वाढेल.
advertisement
धनू राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या मेहनतीचं चीज करणारा आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी जे कष्ट घेतले आहेत, त्याची दखल आता घेतली जाईल. व्यवसायानिमित्त केलेल्या छोट्या प्रवासातून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. नेटवर्किंगमुळे नवीन संधी चालून येतील. फक्त एकच काळजी घ्या की, या काळात कोणाशीही विनाकारण वाद घालू नका.
advertisement
कुंभ राशीतच बुधाचा प्रभाव जास्त असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे 14 दिवस प्रगतीची मोठी झेप घेण्याचे असतील. तंत्रज्ञान, संशोधन किंवा विश्लेषणात्मक कामात असलेल्या लोकांसाठी नवीन करिअरच्या संधी निर्माण होतील. व्यापाऱ्यांना नवीन करार मिळू शकतात, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार करणं सोपं होईल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच सकारात्मक बदल या काळात दिसून येईल.








