Chaturgrahi Yog 2026: आपली वेळ आलीच! कुंभ राशीत चतुर्ग्रही योग जुळला, सूर्य-राहुची जोडी 3 राशींना श्रीमंत बनवणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ग्रहांचे गोचर सतत होत असते, त्यातून शुभ-अशुभ योग जन्म घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार 13 फेब्रुवारी रोजी सूर्य मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीपासूनच राहू आहेच. सूर्याच्या प्रवेशापूर्वी 3 फेब्रुवारीला बुध आणि 6 फेब्रुवारीला शुक्र देखील कुंभ राशीत येऊन बसतील.
advertisement
advertisement
advertisement
कर्क - या चतुर्ग्रही योगामुळे कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर सुधारणार आहे. तुमचे खर्च नियंत्रणात राहतील आणि उत्पन्नात अनपेक्षित वाढ होईल. तुम्हाला गुप्त मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे वेगाने पूर्ण होतील. घर, फ्लॅट किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
कुंभ - हा चतुर्ग्रही योग तुमच्याच राशीत होत असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. तुमची कमाई वाढणार असून विशेषतः व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ भरभराटीचा असेल. तुमच्या बोलण्यात आणि व्यक्तिमत्वात सकारात्मक सुधारणा होईल, ज्यामुळे तुमचे लोकांशी असलेले संबंध सुधारतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात तुम्ही जोडलेले नवीन लोक भविष्यात तुम्हाला दीर्घकालीन फायदा मिळवून देतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








