Astrology: आंधळेपणानं विश्वास ठेवू नका! या राशींसाठी 4 जानेवारीपासून विपरित ग्रहमान, मोठे निर्णय टाळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Gochar 2025 Negative Impact: नवीन वर्ष 2025 सुरू झाले असून वर्षाच्या पहिल्या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र यासह काही ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येईल. ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह लवकरच राशीपरिवर्तन करणार आहे.
advertisement
advertisement
वृषभ - ज्योतिषशास्त्रानुसार बुध तुमच्या राशीतून आठव्या भावात प्रवेश करेल. अशा स्थितीत या काळात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही जुने आजारही त्रास देऊ शकतात. करिअरशी संबंधित मोठे निर्णय घेणे टाळा. कोणत्याही नवीन योजनेवर काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमच्या बोलण्याने लोकांचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे याकाळात कमी बोला आणि जास्त ऐका. ग्रहांचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी गणेशाची पूजा करावी. असे केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढेल.
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांनी बुधाच्या या संक्रमणात थोडे सावध राहावे. या काळात तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी प्रत्येक कामात सावध राहा. 24 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे हुशारीने खर्च करा. सासरच्या मंडळींशी बोलताना आपल्या बोलण्याकडे लक्ष द्या. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. ग्रहांचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी गाईला हिरवा चारा द्यावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होईल.
advertisement
advertisement
मकर - व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते. नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा. ग्रहांचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी हिरवे वस्त्र परिधान करून गणेशाला मोदक अर्पण करावेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)