Ganesh Chaturthi 2025: हाकेला बाप्पा धावून येणार! गणेश चतुर्थीला नवपंचम राजयोग जुळल्यानं या 3 राशींचा गोल्डन टाईम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ganesh Chaturthi 2025: वैदिक कॅलेंडरनुसार व्रत आणि सणांमध्ये ग्रहांचे संक्रमणही खास मानले जाते. त्यामुळे काही शुभ आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर म्हणजेच संपूर्ण राशीचक्रावर पडतो. गणेश चतुर्थी उद्या 27 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी शुक्र आणि वरुण (नेपच्युन) नवपंचम राजयोग निर्माण करत आहेत.
advertisement
मिथुन राशी - नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमचे अडकलेले काम पूर्ण होईल. गणेशोत्सवामध्ये व्यावसायिकांना चांगले पैसे मिळतील. मोठा व्यवसाय करार होऊ शकतो. तसेच, नवीन भागीदार व्यवसायात सामील होतील, ते खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वाद आता कमी होतील, कुठे तरी बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. याकाळात तुम्ही पैसेही वाचवू शकाल.
advertisement
कर्क - नवपंचम राजयोगाची निर्मिती कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. तसेच, हा काळ तुमच्यासाठी सामाजिक आणि आर्थिक यश आणू शकतो. मित्रांनी सहकार्य केल्यानं मोठे फायदे होतील. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तसेच, उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतील.
advertisement
कन्या - नवपंचम राजयोग कन्या राशीच्या लोकांना अनुकूल ठरू शकतो. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच, हा काळ तुमच्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याचा, आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याचा किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाची योजना आखण्याचा आहे.
advertisement
कन्या राशीच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. यावेळी, मोठी ध्येये साध्य करण्यासाठी आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तुमची ऊर्जा वापरा. या काळात तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)