कुटुंबात भांडणं, आर्थिक नुकसान अन् समाजात होऊ शकते बदनामी, डिसेंबरमध्ये या 3 राशीवाल्यांनी व्हा सावधान
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Astro Tips : डिसेंबर महिन्यात सूर्य, शुक्र, बुध आणि मंगळ हे चार मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल. मात्र, ज्योतिषाचार्यांनी तीन राशींच्या लोकांना सावध केले आहे. या तीन राशी कोणत्या आहेत, त्या राशीच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊयात. (परमजीत कुमार/देवघर, प्रतिनिधी)
2024 वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. 9 ग्रहांमध्ये जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींवर पडतो. मात्र, यावेळी एक, दोन नव्हे तर तब्बल 4 ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे.
advertisement
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत डिसेंबर महिना सुरू होणार आहे. डिसेंबरमध्ये चार मोठे ग्रह मंगळ, शुक्र, सूर्य आणि बुध राशी परिवर्तन करणार आहेत. त्याचा प्रभाव तीन राशींवर नकारात्मक होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
advertisement
advertisement
advertisement
डिसेंबरमध्ये कुंभ राशीवरही नकारात्मक प्रभाव पडणार आहे. शत्रू तुम्हाला त्रास देतील. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने मन अस्वस्थ होणार आहे. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडू शकतो. वडिलांशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायात पैसे गुंतवू नका. नुकसान होऊ शकते. जास्त वेगाने गाडी चालवू नका, दुखापत होण्याची शक्यता आहे.