Raksha Bandhan 2025: लाल कि पिवळा? भावाच्या राखीसाठी कोणत्या रंगाचा धागा लकी ठरेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनचा दिवस अगदी जवळ आला आहे. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेलं रक्षाबंधन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. रक्षाबंधनला बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. आकर्षक, चांगली राखी बहिण आपल्या भावासाठी शोधून घेते, राखीचा रंग, तिचा धागा कोणत्या रंगाचा, कसा आहे, याचेही विशेष महत्त्व मानले जाते.
advertisement
रक्षाबंधनला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ पर्यंत असेल, म्हणजे ७ तास ३७ मिनिटे हा मुहूर्त आहे. राखी बांधण्यासाठी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:२२ ते पहाटे ५:०२ पर्यंत असेल. याशिवाय अभिजीत मुहूर्त दुपारी १२:१७ ते दुपारी १२:५३ पर्यंत असेल. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग ९ ऑगस्ट रोजी पहाटे ५:४७ ते दुपारी २:२३ पर्यंत असेल.
advertisement
सनातन हिंदू धर्मात लाल आणि पिवळा दोन्ही रंग खूप शुभ मानले जातात. लाल रंग प्रेम, ऊर्जा आणि मांगल्याचं प्रतीक मानला जातो तर पिवळा रंग आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे लाल किंवा पिवळ्या कोणत्याही रंगाच्या धाग्याची राखी भावाला बांधू शकता. राखीच्या धाग्याचे हे दोन्ही रंग भाऊ आणि बहिणीतील नाते आणखी दृढ करू शकतात.
advertisement
advertisement
हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचा आणि उत्साहाचा असून तसं पाहायला गेल्यास राखीचा रंग लाल असो की पिवळा याने फारसा फरक पडत नाही. या सणाचा हेतू कुटुंब व्यवस्थेतील दोन लोकांच्या नात्यातील प्रेम आणि भावनेचा आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या या शुभ प्रसंगी रंगांमध्ये कन्फ्युज होण्याची गरज नाही. वरती सांगितलेल्या राख्यांचे रंग शक्य असल्यास वापरावे. बाकी आपला हा सण प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करा. यामुळे तुमच्या नात्यात नेहमीच प्रेम आणि विश्वास राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)