शेअर मार्केट ते करिअर, शनी अस्त आणि वक्रीचा बसणार जबरदस्त फटका; 'या' सेक्टर्सवर होणार भयंकर परिणाम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनिदेव जेव्हा आपली चाल बदलतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक स्थितीवर होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनिदेव जेव्हा आपली चाल बदलतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक स्थितीवर होतो. 2026 हे वर्ष शनीच्या अस्तामुळे आणि वक्री चालीमुळे अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. शनीचा हा प्रवास करिअरपासून आरोग्यापर्यंत आणि रिअल इस्टेटपासून नैसर्गिक आपत्तींपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये मोठी खळबळ माजवू शकतो.
advertisement
शनीचा अस्त आणि वक्री होण्याचा नेमका कालावधी: पंचांगानुसार, 2026 मध्ये शनीच्या दोन महत्त्वाच्या स्थिती असतील. 13 मार्च 2026 पासून शनिदेव मीन राशीत अस्त होतील आणि 22 एप्रिल 2026 पर्यंत सुमारे 40 दिवस याच स्थितीत राहतील. तर 27 जुलै 2026 पासून शनि वक्री सुरू करतील आणि 11 डिसेंबर 2026 पर्यंत म्हणजे सुमारे 138 दिवस याच अवस्थेत राहतील. या काळात शनीची शक्ती कमी झाल्यामुळे किंवा त्याची दृष्टी वक्र झाल्यामुळे जगभरात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
advertisement
करिअर आणि प्रोफेशनवर परिणाम: शनि हा कर्माचा कारक असल्याने तो अस्त किंवा वक्री असताना नोकरी आणि व्यवसायात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक कंपन्यांमध्ये ले-ऑफ किंवा पदकपात होण्याची शक्यता वाढेल. या काळात केलेल्या कष्टाचे फळ मिळण्यास विलंब होईल, ज्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य येऊ शकते. जे लोक कामात शॉर्टकट घेतात, त्यांना शनीच्या वक्री काळात मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
advertisement
आर्थिक क्षेत्रासाठी आव्हानात्मक काळ: शनीचा प्रभाव जागतिक शेअर बाजार आणि बँकिंग क्षेत्रावर स्पष्टपणे दिसून येईल. विशेषतः लोखंड, तेल, गॅस आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून येईल. पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडेल.
advertisement
रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा तडाखा: शनि हा जमिनीचा आणि बांधकामाचा कारक आहे. शनीच्या वक्री चालीमुळे रिअल इस्टेटमध्ये मंदीचे सावट येऊ शकते. नवीन गृहप्रकल्प रखडण्याची किंवा घरांच्या किमतीत अचानक चढ-उतार होण्याची शक्यता आहे. या काळात नवीन मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करणे आवश्यक ठरेल.
advertisement
advertisement
नैसर्गिक आपत्ती आणि नवीन आजार: ज्योतिषींच्या मते, शनीचा वक्री काळ नैसर्गिक आपत्तींसाठी कारणीभूत ठरू शकतो. पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली वाढल्यामुळे काही देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू शकतात. हवामानातील बदलांमुळे किंवा पर्यावरणाच्या समतोलामुळे काही नवीन प्रकारचे आजार किंवा संसर्ग पसरण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







