Shani Nakshatra Gochar: शनिची माया, आता देऊ लागेल सुखाची छाया! ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून 3 राशी जोमात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Nakshatra Gochar: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच शनिच्या स्थानात बदल होणार आहे. शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार असून स्वनक्षत्रातून गुरू ग्रहाच्या नक्षत्रात होत असलेले हे गोचर अनेक राशींना लाभदायी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे नक्षत्र परिवर्तन 3 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. शनी सध्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात असून तो आता गुरू ग्रहाच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनिचे हे नक्षत्र परिवर्तन सुमारे चार महिने प्रभाव दाखवेल, याचा विविध राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येईल.
advertisement
advertisement
सिंह - शनिच्या नक्षत्र गोचराचे शुभ परिणाम पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल. शनिच्या कृपेने तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल, ज्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. सगळ्या कामात आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
advertisement
advertisement
advertisement
शनिकडून शुभ परिणाम मिळवण्यासाठी आणि अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी काही खास उपाय करणे लाभदायक ठरू शकते. शनिदेवाची पूजा करावी आणि 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. गरिबांना काळ्या रंगाचे वस्त्र किंवा उडीद डाळ दान करावी. हनुमानाची पूजा उपासना (हनुमान चालीसा पठण) करणे अत्यंत शुभ मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)