March Astrology: सूर्याची मीन संक्रात! 15 मार्चनंतर नशिबाची डबल साथ या 6 राशींना मिळणार; भाग्योदय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: दिनांक 15 मार्च 2026 रोजी होणारे सूर्याचे मीन राशीतील संक्रमण सर्व राशींच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे. सूर्य जेव्हा मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा वातावरणात अधिक भावनिक आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवू लागते. सूर्य हा आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे, तर मीन रास ही कल्पकता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चालणाऱ्या या काळात तर्कशास्त्रापेक्षा अंतर्मनाचा आवाज अधिक प्रभावी ठरेल.
मेष - सूर्याचे हे संक्रमण तुमच्यासाठी थोडे आव्हानात्मक आणि खर्चिक ठरू शकते. विनाकारण वादात पडणे टाळा. आरोग्याची, विशेषतः डाव्या डोळ्याची काळजी घ्या. शरीरातील कॅल्शियम कमी होणार नाही याकडे लक्ष द्या. कोर्टाची कामे किंवा जुने वाद सामोपचाराने सोडवणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
advertisement
वृषभ - तुमच्यासाठी हे संक्रमण खूपच फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि खूप दिवसांपूर्वी कोणालातरी दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि नोकरीत पदोन्नतीचे योग येतील. जर तुम्ही घर किंवा जागा बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ उत्तम आहे. मुलांच्या बाबतीत असलेल्या चिंता कमी होतील. नवीन जोडप्यांना संतानप्राप्तीचे सुख मिळू शकते.
advertisement
मिथुन - सूर्याचे हे भ्रमण तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत करेल. बऱ्याच काळापासून सतावणारे प्रश्न आता सुटतील. आई-वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. जर तुम्ही परदेशी कंपनीत नोकरीसाठी किंवा परदेशातील नागरिकत्वासाठी प्रयत्न करत असाल, तर ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे. सरकारी कामात पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल.
advertisement
कर्क - या काळात तुम्हाला अनेक अनपेक्षित अनुभव येतील. कधीकधी तुमची कामे अर्ध्यावर अडकल्यासारखी वाटतील, पण धीर सोडू नका; शेवटी तुम्हाला यश नक्की मिळेल. परदेश प्रवासाची संधी चालून येईल. तुमच्या धाडसामुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर सहज मात कराल. घरातील मोठ्या व्यक्तींशी आणि धाकट्या भावांशी वाद घालणे टाळा. कायदेशीर प्रकरणांमधील निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
advertisement
सिंह - सिंह राशीसाठी हे संक्रमण संमिश्र फळे देणारे असेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. जर तुम्हाला सरकारी टेंडर किंवा कंत्राटासाठी अर्ज करायचा असेल, तर हा काळ अनुकूल आहे. ऑफिसमध्ये होणाऱ्या राजकारणापासून लांब राहा; आपले काम संपवून सरळ घरी जाणे श्रेयस्कर ठरेल. आयुष्यात चढ-उतार आले तरी तुमची प्रतिष्ठा मात्र कायम राहील.
advertisement
कन्या - सूर्याचे हे भ्रमण तुमच्यासाठी अनेक चढ-उतार घेऊन येईल. सूर्याचा स्वभाव तसा तेजस्वी असला तरी या राशीत तो तुम्हाला कठीण परिस्थिती हाताळायला मदत करेल. मात्र, कुटुंबात थोडे खटके उडू शकतात किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. विवाहाच्या चर्चेत थोडा उशीर होऊ शकतो. सरकारी कामे सुरळीत पार पडतील. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे.





