यंदाचे रक्षाबंधन 5 राशींचे श्रीमंतीचे दारं खुले करणार! हाती पैसाच पैसा येणार

Last Updated:
Raksha Bandhan 2025 : यंदा रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट रोजी, शनिवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी आकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी अशी सूर्य-शनी युती होत आहे.
1/6
Raksha Bandhan 2025
यंदा रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट रोजी, शनिवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी आकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी अशी सूर्य-शनी युती होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या युतीमुळे नवपंचम राजयोग निर्माण होत असून तो वर्षअखेरपर्यंत 5 प्रमुख राशींना विशेष लाभदायक ठरणार आहे. नवपंचम योग म्हणजे नवव्या आणि पाचव्या स्थानातील शुभ ग्रहांची युती, जी प्रगती, सौख्य आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येते.
advertisement
2/6
मेष (Aries)
मेष (Aries) -  सध्या साडेसातीचा सामना करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी ही युती दिलासादायक ठरणार आहे. शनि वक्री असल्याने या कालावधीत त्रास कमी होतील. आरोग्य चांगले राहील, खर्च नियंत्रणात येईल, आणि मानसिक शांतता मिळेल. काही अनपेक्षित यश किंवा मिळकत होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini) -  नवपंचम योगामुळे नोकरी व व्यवसायात मोठे बदल घडतील. नवीन नोकरीची संधी, वरिष्ठांचे सहकार्य आणि सरकारी कामांत यश मिळू शकते. आर्थिक लाभासोबत परदेश दौऱ्यांमधूनही फायदा होण्याची शक्यता आहे. साचलेली ऊर्जा सकारात्मक दिशेने वाहू लागेल.
advertisement
4/6
सिंह (Leo)
सिंह (Leo) - सिंह राशीसाठी ही युती भाग्योदयाची ठरणार आहे. व्यवसाय वाढेल, बँक बॅलन्स मजबूत होईल. घरगुती समस्या सुटतील आणि कौटुंबिक आनंद मिळेल. आरोग्याची काळजी दूर होईल. नेतृत्वगुण वाढतील आणि आत्मविश्वास पुन्हा उंचावेल
advertisement
5/6
कन्या (Virgo)
कन्या (Virgo) -  या राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग घर खरेदी, स्थावर संपत्ती आणि प्रॉपर्टीशी संबंधित गोष्टी पूर्ण होण्यासाठी शुभ राहील. आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक संबंध सुधारतील. ऑफिसमध्ये वरिष्ठांसोबतचे संबंध दृढ होतील आणि मनासारखे निर्णय होतील.
advertisement
6/6
मीन (Pisces)
मीन (Pisces) -  शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा असतानाही, या शुभ युतीमुळे अडथळे दूर होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील, व्यावसायिक यश मिळेल. परदेशातून यश आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक निर्णय योग्य दिशेने जातील.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement